पाच हजार वर्षांपूर्वीचा ‘ओत्झी’ होता टक्कलग्रस्त?

पाच हजार वर्षांपूर्वीचा ‘ओत्झी’ होता टक्कलग्रस्त?
Published on
Updated on

लंडन : 1991 मध्ये आल्प्स पर्वतावर काही जर्मन पर्यटकांना बर्फात गोठून नैसर्गिकरीत्याच 'ममी' बनलेल्या एका प्राचीन माणसाचा देह आढळला. हा माणूस तब्बल 5300 वर्षांपूर्वीचा असल्याचे अभ्यासांती निष्पन्न झाले. संशोधकांनी त्याला 'ओत्झी' असे नाव दिले. पाठीवर कुणी तरी बाण मारल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्याबाबत अजूनही संशोधन होतच असते. आता संशोधकांनी त्याच्या डीएनएचा अभ्यास करून म्हटले आहे की ओत्झी कदाचित टक्कलग्रस्त व लठ्ठ होत होता.

उत्तर इटलीतील आल्प्स पर्वतराजीतील एका खिंडीत या माणसाचा देह जर्मन पर्यटकांना आढळला होता. बर्फात गाडला गेल्याने हा देह हजारो वर्षे सुरक्षित राहिला होता व नैसर्गिकरीत्याच त्याची 'ममी' बनली होती. त्याच्याजवळील अवजारे, शस्त्रे, त्याचे कपडे, त्याचे शेवटचे जेवण, त्याच्या जीवनकाळातील हवामान तसेच अतिशय उंच ठिकाणी झालेल्या त्याच्या हत्येपूर्वी त्याने केलेला शेवटचा प्रवास याबाबत संशोधन करण्यात आलेले आहे. 2012 मध्ये त्याच्या शरीरातून डीएनए नमुना घेण्यात आला होता व त्याचे जनुकीय विश्लेषणही करण्यात आले होते.

वयाच्या चाळीशीत हा माणूस मृत्युमुखी पडला होता. तत्पूर्वी त्याच्यामध्ये टक्कल पडणे, मधुमेह आणि लठ्ठपणाची लक्षणे दिसून येत होती असे आता आढळले आहे. अनाटोलिया म्हणजेच सध्याच्या तुर्कीमधून अनेक लोक युरोपमध्ये स्थलांतरित होत होते. त्यांनीच आठ हजार वर्षांपूर्वी शेतीचे नवे तंत्रही आणले होते. अशाच समूहामधील हा ओत्झी होता, असेही दिसून आले आहे. तसेच यापूर्वी अनुमान केले त्याच्या विपरित ओत्झीची त्वचा अधिक उजळ नव्हती. तसेच त्याचे केसही काळेच असावेत असे दिसून आले आहे. 'सेल जिनोमिक्स' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news