हुबेहूब डिजिटल क्लोन तयार करणारे एआय डिव्हाईस!
वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजेन्स क्षेत्रात इतकी प्रचंड प्रगती होत आहे की, ते पाहता सारे भविष्य आता याच क्षेत्राचे असेल, असे भासत आहे. या पार्श्वभूमीवर, खळबळ उडवून टाकणारे असे एक एआय डिव्हॉइस लाँच केले गेले आहे, जे कोणत्याही व्यक्तीचा डिजिटल क्लोन तयार करू शकते. या डिव्हाईसमधील डिजिटल क्लोन इतके हुबेहूब असते व इतके अचूक त्या व्यक्तीप्रमाणेच संवाद साधते, ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे.
या डिव्हाईसचे नाव वी हेड जीपीटी असे आहे. या माध्यमातून क्लोनला मनुष्यासारखा हुबेहूब चेहरा लाभतो आणि इतके कमी की काय म्हणून त्या मनुष्याच्या चेहर्यावरील भावही त्यात जसेच्या तसे झळकतात. या डिव्हाईसशी संवाद साधताना असे वाटते की, आपण त्या क्लोनशी नव्हे तर त्या व्यक्तीशीच संवाद साधत आहोत. वी हेड हा टेक्स्ट आधारित आर्टिफिशियल इंटेलिजेन्स प्लॅटफॉर्म असून त्याआधारेच या क्लोनला एक्स्प्रेशन्स व आवाज प्राप्त होते.
या महिन्याच्या दुसर्या टप्यात या क्लोनची पहिली डिलिव्हरी होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर, वी हेड मॉडेल पॉप्युलर टूल चॅट जीपीटीसह कार्यरत आहे. यात अल्ट्रा हायडेफिनेशन एलईडी स्क्रीन लावले असून यूजर्स यात अनेक चेहर्यांमधून आपला आवडता चेहरा निवडू शकतात. डिव्हाईसच्या आरामदायी वापरासाठी मोटरच्या माध्यमातून चालणारी मानही त्याला बसवली गेली आहे.
वी हेड तयार करणार्या या फर्मने याचे अनेक उपयोग असल्याचा दावा केला आहे. हे डिव्हाईस मुलांसाठी एआय शिक्षकाप्रमाणे काम करू शकते. शिवाय, दिव्यांगांसाठी सहायक म्हणूनही योगदान देऊ शकतो. अर्थात, हा डिजिटल क्लोन घेण्यासाठी किंमत मात्र भलतीच महागडी मोजावी लागू शकते आणि ती सर्वसामान्यांच्या निव्वळ आवाक्यापलीकडील असणार आहे. या एका डिव्हाईसची किंमत सरासरी 4 लाख 12 हजार 339 रुपये इतकी आहे. ज्यांना आपल्याशीच फेस-टू-फेस संवाद साधायचा अनुभव घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हे डिव्हाईस वरदान असेल, असा फर्मचा दावा आहे.