America made artificial liver
अमेरिकेत कृत्रिम यकृत बनवले. Pudhari File Photo

अमेरिकेत बनवले कृत्रिम यकृत

या संशोधनात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश
Published on

वॉशिंग्टन : सध्या अनेक अवयवांचे रुग्णांमध्ये गरजेनुसार प्रत्यारोपण होत असते. मात्र, दात्यांची संख्या कमी असल्याने असे अवयवही कमी संख्येनेच उपलब्ध असतात. त्याला पर्याय म्हणून कृत्रिम अवयवांची निर्मिती करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात. अमेरिकेत याच प्रयत्नांमधून कृत्रिम यकृतही बनवण्यात आले. विशेष म्हणजे या संशोधनात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. यकृताच्या वृद्धी क्षमतेचा वापर करून कृत्रिम यकृताच्या ऊती तयार करता येऊ शकतात; पण त्यात आतापर्यंत यश आले नव्हते. परिपक्व यकृत पेशी म्हणजे हेपॅटोसायइटस् या शरीरातून बाहेर काढल्यानंतर लगेचच त्यांचे कार्य बंद करतात. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत काम करणार्‍या अभियंता संगीता भाटिया यांच्या मते यकृत जर त्याचा काही भाग कापला तरी पुन्हा वाढते. यकृताच्या पेशी या वृद्धीस अनुकूल असतात; पण काहीवेळा त्या शरीराबाहेर काढल्यानंतर या गुणधर्मास खर्‍या उतरत नाहीत.

डुकराच्या शरीरात यकृत केले विकसित

यकृत विकारांनी त्रस्त जगातील पन्नास कोटी लोकांना फायदा

भाटिया व त्यांच्या सहकार्‍यांनी अशी काही रासायनिक संयुगे शोधून काढली आहेत, ज्यांच्यामुळे यकृताच्या पेशी शरीराबाहेर प्रयोगशाळेतही विकसित होतात तसेच त्यांची संख्याही वाढत जाते. अशा प्रकारे वाढवलेल्या पेशी या यकृताच्या सुनियंत्रित ऊती तयार करण्यासाठी वापरता येऊ शकतात व त्यामुळे हेपॅटिटिस-सी यासह अनेक यकृत विकारांनी त्रस्त असलेल्या जगातील पन्नास कोटी लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. संशोधकांनी यात अशी पद्धत वापरली आहे की, ज्यात यकृताच्या पेशी या थरांमध्ये फायब्रोब्लास्टसमवेत वाढतात. त्यातून यकृताच्या पेशीला वाढण्यासाठी व तिचे कार्य कायम राहण्यासाठी जी 12500 विविध रसायने आवश्यक असतात, त्यांचा अभ्यास शक्य झाला. संशोधकांनी यकृतातील 83 वितंचकांची यातील भूमिका यात तपासली. यापुढे एमआयटीचे पथक अशा प्रकारच्या सुनियंत्रित यकृत पेशी पॉलिमर ऊतींच्या साच्यात टाकून त्यांचे उंदरांमध्ये प्रत्यारोपण करण्याच्या विचारात आहेत. रुग्णाच्या यकृत पेशींची शरीराबाहेर वाढ करता येईल अशा प्रकारची संयुगे औषधांच्या रूपात आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. या यकृताच्या सुनियंत्रित ऊती तयार करण्यासाठी वापरता येऊ शकतात व त्यामुळे हेपॅटिटिस-सी यासह अनेक यकृत विकारांनी त्रस्त असलेल्या जगातील पन्नास कोटी लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो.

America made artificial liver
हेपेटायटिस व्हायला नको, तर जाणून घ्या यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news