airbus a 30 : अंटार्क्टिकावर प्रथमच उतरले ‘एअरबस ए-340’!

airbus a 30 : अंटार्क्टिकावर प्रथमच उतरले ‘एअरबस ए-340’!

Published on

केपटाऊन :

दक्षिण ध—ुव अंटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशावर प्रथमच 'एअरबस ए-340' (airbus a 30) हे विमान उतरले. पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका कंपनी समूहाने 'एअरबस ए-340' ला अंटार्क्टिकात सुरक्षित लँडिंग करून नवा इतिहास रचला आहे. 'हाय फ्लाय' नावाच्या एका एव्हिएशन कंपनीने हे विमान उतरवले. (airbus a 30)

'हाय फ्लाय 801' च्या या फ्लाईटने मंगळवार, नि. 23 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनमधून उड्डाण केले होते आणि पाच तासांच्या प्रवासानंतर हे विमान अंटार्क्टिकामध्ये लँड झाले. अंटार्क्टिकामध्ये वर्षभर बर्फाचा अनेक मीटर उंचीचा स्तर असतो. या बर्फावरच 3 हजार फूट लांबीचा रनवे तयार करण्यात आला. 290 प्रवासी क्षमता असलेल्या 223 फूट लांबीच्या विमानाला इथे लँड करण्यापूर्वी 2019 ते 2020 या काळात सुमारे सहावेळा चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

'हाय फ्लाय' ने म्हटले आहे की अंटार्क्टिका हा खंड उद्योन्मुख पर्यटनक्षेत्र आहे. त्यामुळे कंपनी याठिकाणी अन्यही अनेक प्रकल्पांवर काम करीत आहे. टीमने अंटार्क्टिकावर सुमारे तीन तास व्यतित केले. ऑस्ट्रेलियाचे मिलिट्री पायलट आणि संशोधक जॉर्ज हुबर्ट विल्किन्स यांनी 1928 मध्ये अंटार्क्टिकात प्रथमच उड्डाण केले होते. ते 'लॉकहीड वेगा 1' या मोनोप्लेनमधून तिथे गेले होते. आतापर्यंत तिथे विमानतळ बनलेले नसले तरी 50 लँडिंग स्ट्रीप आणि रनवे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news