बामणी येथील ठिय्या आंदोलनस्थळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली भेट

मुख्यमंत्र्यांना भेटून कंपनी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन
Minister Mungantiwar visited the ongoing protest site at Bamni
बामणी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी मंत्री मुनगंटीवार यांनी भेट दिलीRepresentive Photo

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : बल्लारपूर तालुक्यामध्ये बामणी येथील बामणी प्रोटीन्स कंपनीच्या भारतीय केमिकल वर्कर युनियनच्या कामगारांचे मागील महिनाभरापासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनस्थळी सोमवारी (दि. 24) राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असा विश्वास आंदोलनकर्त्यांना दिला.

भारतीय केमिकल वर्कर युनियनचे बामणी प्रोटीन्स अध्यक्ष देवराव नींदेकर यांच्याशी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा केली. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढणार असल्याचे सांगून मुनगंटीवार यांनी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. याबाबत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना दूरध्वनी करून पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याबाबत चर्चा देखील केली.

Minister Mungantiwar visited the ongoing protest site at Bamni
नांदेड-नागपूर महामार्गावर बामणी फाटा येथे रास्ता रोको, वाहतूक ठप्प

बामणी प्रोटीन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तत्पूर्वी, पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तसेच कामगार प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांसोबात ऑनलाईन बैठक घ्यावी, असेही निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले आहेत .

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंग चंदेल, वर्कर युनियनचे अध्यक्ष देवराव निंदेकर,महामंत्री जहीरूद्दीन शेख, कार्याध्यक्ष दिनेश गोंदे,उपाध्यक्ष चंद्रशेखर निकोडे,उपाध्यक्ष अशपाक शेख,भाजपा जेष्ठ नेते राजेंद्र गांधी,बाळकृष्ण गोंदे, प्रभाकर वैद्य उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news