इंद्रधनुष्यात न्हाऊन निघणारे झाड!

इंद्रधनुष्यात न्हाऊन निघणारे झाड!
Published on
Updated on

मनिला : निसर्गाने नेहमीच आपल्याला भरभरून दिले आहे. यातील काही निसर्गसंपदा तर अगदी आश्चर्यचकीत करून टाकते. केवळ पृथ्वीतलावरच असे अभिजात निसर्गसौंदर्य आढळून येते. अशाच एका निसर्गसंपदेचे एक नितांत सुंदर उदाहरण म्हणजे रेनबो युकेलिप्टस हे अनोखे झाड! हे झाड इंद्रधनुष्याच्या सात रंगांनी सजले आहे आणि यामुळेच ते सातत्याने आकर्षणाचे केंद्र ठरत आले आहे.

रेनबो युकेलिप्टस पाहिल्यानंतर सर्वप्रथम हे संगणकावर रंगवलेले चित्र असेल, असाच भ्रम होऊ शकतो. मात्र, निसर्गत:च हे झाड रंगीबेरंगी आहे आणि हा अविष्कार पाहणार्‍यांचे डोेळे दीपल्याशिवाय राहत नाहीत. इंद्रधनुष्याच्या पट्टीत सजलेल्या रंगाप्रमाणे न्हाऊन निघालेले हे झाड अर्थातच आश्चर्यकारक आहे.

अवघ्या जगभरात या झाडाला आपल्या इंद्रधनुष्यी सौंदर्यासाठी ओळखले जाते. एरव्ही याला रेनबो युकेलिप्टस या नावाने ओळखले जाते. शास्त्रीय भाषेतील त्याचे नाव युकेलिप्टस डेगलुप्टा असे म्हटले जाते. रंगीत झाडांच्या यादीत अव्वल राहिलेल्या या झाडाचे वैशिष्ट्य असे आहे की, प्रत्येक रंग यात थोड्या थोड्या प्रमाणात विखुरलेला असतो. आणखी एक आश्चर्य म्हणजे झाड जसजसे वाढत जाते, तसतसा त्याचा रंग उजळत जातो.

दरवर्षी युकेलिप्टसची साल निघते आणि दरवर्षी नवनवे रंग बहरतात. या झाडाची सर्वसाधारण उंची 76 मीटर्स इतकी असते. शिवाय, त्याचे लाकूडही महागडे असते. या लाकडापासूनच सफेद पेपरही तयार केला जातो. हे झाड फिलीपाईन्स, इंडोनेशिया व पापुआ न्यू गिनी येथे अधिक प्रमाणात आढळून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news