

मेक्सिको : सोशल मीडियावर सातत्याने बरेच व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. यातील काही गोष्टींवर तर विश्वास ठेवणेही कठीण असते. असाच एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून, आश्चर्य वाटेल पण यात चक्क हवेत उडणारा दगड दिसून येतो आहे.
हवेत उडणारा हा दगड पाहिल्यावर सोशल मीडियावर अर्थातच दोन गट झाले आहेत आणि या दगडावरून वाद सुरू आहे. काहींच्या मते हा खरोखरच हवेतील दगड आहे आणि त्यामागे शास्त्रीय चमत्कार लपलेला आहे, तर काहींच्या मते हा निव्वळ ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे फक्त भास आहे.
आता हा दगड प्रथमदर्शनी हवेत असल्यासारखा भासत असला तरी ते प्रत्यक्षात शक्य नाही आणि म्हणूनच नेमकी यामागील वस्तुस्थिती काय, हा प्रश्न उपस्थित होईल. याचे उत्तर असे आहे की, हा दगड पाण्यातील आहे आणि समोरील बाजूला त्याची सावली देखील दिसून येते. पण, मुळातच पाण्याचा रंग असा बेमालूम दिसतो आहे की, त्यामुळे हा दगड हवेतच असल्याचा भास होतो. हा फोटो म्हणजे ऑप्टिकल इल्यूजनचा एक उत्तम नमुना आहे. ज्यात प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते आणि दिसते काही तरी भलतेच. याआधीसुद्धा असाच एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात पाण्यात असलेला दगड हवेत उडताना दिसला होता. त्यावेळीसुद्धा यावर दोन गट झाले होते. त्याचीच आता नव्याने पुनरावृत्ती झाली आहे.