खांद्यावर आला लाल जेलीसारखा ट्यूमर!

खांद्यावर आला लाल जेलीसारखा ट्यूमर!

वॉशिंग्टन : ट्यूमरचेही अनेक प्रकार पाहायला मिळत असतात. पोटातून किंवा अगदी डोक्यातूनही मोठ्या आकाराचे ट्यूमर बाहेर काढले गेल्याची उदाहरणे आहेत. आता अमेरिकेतील एका मुलीच्या खांद्यावर अत्यंत दुर्मीळ व विचित्र असा ट्यूमर आला आहे. लाल रंगाचा हा ट्यूमर एखाद्या जेलीसारखा किंवा गमी कँडीसारखा आहे. त्याला दाब दिला की जेलीसारखी हालचाल होते!

हा ट्यूमर दुर्मीळ प्रकारच्या 'पिलोमॅट्रिकोमा'चा आहे. केसांच्या फॉलिकल्समध्ये हा ट्यूमर विकसित होत असतो. सहसा असे ट्यूमर डोके किंवा मानेवर विकसित होतात. असे ट्यूमर निर्माण होण्याची नेमकी कारणे स्पष्ट नाहीत. या मुलीच्या खांद्यावर जो ट्यूमर विकसित झाला आहे त्याला 'ब्युलोस पिलोमॅट्रिकोमा' या नावाने ओळखले जाते. 'ब्युलोस' हा शब्द पाण्याने भरलेल्या फोडासारख्या स्थितीशी संबंधित आहे. 'जामा डर्मेटोलॉजी' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध झाली आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की या मुलीच्या उजव्या खांद्यावर हा लाल ट्यूमर विकसित झाला. त्यामागे कोणतीही शारीरिक दुखापत किंवा कीटकाच्या दंशासारखी कारणे नव्हती. हा ट्यूमर अचानकच दिसू लागला होता. सहा महिन्यांच्या काळात त्याची वाढ झाली व 5.5 चौरस इंचाच्या जागेत तो पसरला. त्याच्या सर्वात उंच टोकापर्यंत त्याची त्वचेच्या पृष्ठभागापासूनची उंची एक इंचापेक्षा अधिक आहे. हा ट्यूमर वाढला असला तरी मुलीचे अनेक लॅब रिपोर्टस् नॉर्मल आहेत. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हा अनोखा ट्यूमर काढून टाकला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news