अवघ्या एक हजारात मिळणार 32 हजार कोटींचा महल!

अवघ्या एक हजारात मिळणार 32 हजार कोटींचा महल!
Published on
Updated on

लंडन : सध्याच्या कालावधीत स्थावर मालमत्तेच्या किमती अगदी गगनाला भिडत आहेत. ज्यावेळी संधी मिळेल, त्यावेळी स्थावर मालमत्ता खरेदी करून प्रत्येक जण भविष्य सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करून असतो आणि त्यात काही गैरही नसते; पण काही वेळा असे करतानाही किमती इतक्या टोकाला पोहोचलेल्या असतात की, आयुष्यभराची पुंजी लावली तरी ते पुरेसे ठरत नाही. अशा परिस्थितीत थोडीथोडकी नव्हे, तर चक्क 32 हजार कोटी रुपयांची मालमत्ता अवघ्या एक हजार रुपये या नाममात्र किमतीत मिळत असेल, तर आश्चर्याने डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाही.

स्पेनच्या बेलिएरिक बेटावर चार आलिशान खोल्यांचा एक व्हिला ऑनलाईन लिलावासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा व्हिला अतिशय आलिशान, विलासी राहणीमानाचे प्रतीक ठरत आला आहे. या व्हिलाची किंमत थोडीथोडकी नव्हे, तर चक्क 32 हजार कोटींच्या घरात आहे. मात्र, 28 जानेवारीपर्यंत या लिलावात केवळ एक हजार रुपये भरून तो आपल्या नावावर करण्याची अनोखी संधी असेल.

1 हजार रुपये भरून ड्रॉमध्ये कोणालाही आपले नशीब आजमावता येणार आहे. चॅरिटी सुपर ड्रॉच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा व्हिला 'द ओमेझ मिलियन पौंड हाऊस सुपर ड्रॉ' या नावाने लिलावासाठी उपलब्ध असेल.

या लिलावातून जमा होणारी सर्व रक्कम इंग्लंडमधील अल्झायमर रिसर्चसाठी वापरली जाणार आहे. 2022 मध्ये या आजाराने इंग्लंड व वेल्समधील जवळपास 74 हजार लोकांचा बळी गेला होता. त्यामुळे सर्व रक्कम या आजाराचा बीमोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, या ड्रॉमध्ये भाग घेण्यासाठी काही अटीदेखील आहेत. यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, केवळ युनायटेड किंगडममधील रहिवासीच यात भाग घेऊ शकणार आहेत. त्यामुळे तेथील नागरिकत्व असेल, तर निश्चितपणाने या ड्रॉमध्ये सहभागी होत नशीब आजमावण्याची संधी असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news