काचेची वस्तू समजले; निघाला हिरा!

काचेची वस्तू समजले; निघाला हिरा!

वॉशिंग्टन : कुणाचे नशीब कधी उघडेल हे काही सांगता येत नाही. 'भगवान देता है तो छप्पर फाडके' असे म्हटले जाते. असंच काहीसं अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत घडलं आहे. त्याच्या हाती अत्यंत मौल्यवान वस्तू लागली; पण त्याला तो एक सामान्य काचेचा तुकडा वाटला. त्याच्या हाती खजिना लागला आहे याची कल्पनाही त्याला नव्हती.

जेरी इव्हान्स असे या व्यक्तीचे नाव आहे. ते अमेरिकेतील अर्कान्सास येथे राहतात. एक दिवस जेरी डायमंडस् स्टेट पार्कच्या क्रेटरवर गेले होते. येथे त्यांना खजिना मिळेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. इव्हान्सला ही सापडलेली वस्तू काचेचा तुकडा वाटली म्हणून त्याने ती खिशात ठेवली. मात्र, नंतर त्याची तपासणी केली असता तो 4.87 कॅरेटचा हिरा असल्याचे आढळून आले!

या पार्कमध्ये तीन वर्षांत सापडलेला हा सर्वात मोठा हिरा आहे. या पार्कच्या धोरणानुसार, येथे येणार्‍या लोकांना सापडलेले हिरे हे त्यांच्याकडे ठेवण्याची परवानगी आहे. या हिर्‍याला नंतर 'इव्हान्स डायमंड' असे नाव देण्यात आले. हा पिरॅमिड आकाराचा हिरा आहे. 'जेव्हा त्यांनी मला फोन केला आणि तो खरा हिरा असल्याचे सांगितले तेव्हा मला खूप आनंद झाला,' असे इव्हान्स यांनी पार्कने आयोजित केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

1972 मध्ये स्टेट पार्कची स्थापना झाल्यापासून येथे 75,000 हून अधिक हिरे सापडले आहेत. जेव्हा इन्वास यांना कळले की त्यांना जे सापडले आहे तो कुठला काचेचा तुकडा नसून हिरा आहे, तेव्हा त्यांना यावर विश्वासच बसला नाही. त्यांनी अमेरिकेच्या जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटकडे चौकशीची मागणी केली. संस्थेने तपासून तो खरा हिरा असल्याचे सांगितले. याआधी 2020 मध्ये एका व्यक्तीला 9.07 कॅरेटचा तपकिरी हिरा सापडला होता. यानंतरही लोकांना लहान-मोठे असे अनेक प्रकारचे हिरे सापडल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news