‘शोले’ स्टाईल बाईकवर चक्क अस्वल!

‘शोले’ स्टाईल बाईकवर चक्क अस्वल!
Published on
Updated on

नवी दिल्ली : 'शोले' मधील 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' मधील गाण्यात जय आणि वीरू जशा 'जोड' बाईकवरून जात असताना दिसतात, तशा बाईकमध्ये जयऐवजी चक्क अस्वल ऐटीत बसलेले दिसले तर? असाच प्रकार रशियातील एका रस्त्यावर पाहायला मिळाला. या बाईकवरून चक्क एक अस्वल नेले जात होते आणि तेही या राईडचा आनंद घेत हातवारे करीत होते!

सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच अवाक् व्हायला होतं. असाच हा एक गंमतीशीर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एक अस्वल पाहू शकता, जे बाईकवर बसून एका शहरातून दुसर्‍या शहरात प्रवास करतेय. पण, लक्षवेधी बाब म्हणजे हे अस्वल जणू एखाद्या राजकीय नेत्यासारखी ऐट दाखवतेय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरले नाही. इंटरनेटवर चर्चेत असलेल्या या अस्वलाचं नाव टिम असं आहे. हे 113 किलोचं अस्वल बाईकवर बसून रशियातील आर्कान्जेस्क शहरात फिरताना दिसतेय.

लक्षवेधी बाब हे अस्वल रस्त्यावर चालणार्‍या लोकांना एखाद्या नेत्यासारखं हातवारे करीत आहे. येणार्‍या जाणार्‍या गाड्यांमधील लोक त्याला हात मिळवतायेत. अन् अस्वल देखील त्यांना अभिवादन करतेय. हा 15 सेकंदांचा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून, गेल्या काही तासांत 18 कोटींपेक्षा अधिक नेटकर्‍यांनी पाहिला आहे. हे अस्वल जणू एखाद्या नेत्यासारखी ऐट दाखवतंय. जणू ते निवडणुकीला उभे राहिलेय आणि लोकांना मतदान करण्याचं आवाहन करतंय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news