अंतराळात लाकडी उपग्रह पाठवण्याची योजना | पुढारी

अंतराळात लाकडी उपग्रह पाठवण्याची योजना

टोकियो : जगात प्रथमच अंतराळात चक्‍क लाकडापासून बनवलेला कृत्रिम उपग्रह पाठवला जाणार आहे. त्याची जपानमध्ये जय्यत तयारीही सुरू आहे. 2023 पर्यंत हा लाकडी उपग्रह अंतराळात पाठवण्यात येईल.

हा लाकडी उपग्रह पर्यावरणाला अनुकूल असा असेल तसेच त्याच्या निर्मितीचा खर्चही कमी असेल. क्योटो युनिव्हर्सिटी आणि सूमितोमो फॉरेस्ट्रीमधील संशोधक या प्रकल्पासाठी काम करीत आहेत.

ज्यावेळी अशा सॅटेलाईटची मोहीम संपुष्टात येते त्यावेळी हा लाकडी सॅटेलाईट पृथ्वीच्या वातावरणात आणला जातो व तिथे तो पूर्णपणे जळून खाक होतो. सध्या अ‍ॅल्युमिनियमपासून सॅटेलाईट बनवले जातात. लाकडी सॅटेलाईट अशा अ‍ॅल्युमिनियम सॅटेलाईटच्या तुलनेत बरेच स्वस्त ठरतात. लाकडात इलेक्ट्रोमॅग्‍नेटिक लहरी प्रवेश करू शकतात.

त्यामुळे त्याच्यामध्ये एक अँटेना असेल. जपानच्या एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर ताकाओ दोई या संशोधनाचे नेतृत्व करीत आहेत. मजबूत लाकडाच्या अनेक स्तरांपासून असा उपग्रह बनवला जाईल व त्यासाठीचे लाकूड विशिष्ट झाडापासून घेतले जाईल. हा सॅटेलाईट दहा सेंटीमीटरच्या बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याप्रमाणे असेल.

Back to top button