सिकल सेल अ‍ॅनिमिया वरील उपचारात हायड्रॉक्सियुरियास मंजुरी | पुढारी

सिकल सेल अ‍ॅनिमिया वरील उपचारात हायड्रॉक्सियुरियास मंजुरी

नवी दिल्‍ली : भारतीय लोकांमध्ये सिकल सेल अ‍ॅनिमिया हा लाल रक्‍तपेशींना प्रभावित करणारा एक सामान्य अनुवंशिक विकार आहे. हा विकार मुलांमध्ये त्यांच्या आई-वडिलांमधील सदोष बीटा ग्लोबिन जनुकांसह येतो. माता-पिता स्वतः या आजाराने ग्रस्त होत नाहीत; पण मुलांमध्ये तो येतो.

सुमारे 0.4 टक्के लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे. तसेच दहा टक्के लोक या आजाराचे वाहक आहेत जे नव्या ‘एससीए’ रुग्णांना जन्म देतात. आता या आजारावरील उपचारासाठी ‘हायड्रॉक्सियुरिया’ या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरलने मंजुरी दिली आहे.

बहुतांश अनुवंशिक आजारांप्रमाणे ‘एससीए’ वर कोणताही उपचार नाही. मात्र वेदना, अ‍ॅनिमिया आणि गंभीर वासो-ओक्लुसिवसारख्या समस्यांवर लक्षणसूचक उपचार उपलब्ध आहेत. अपेक्षाकृत स्वस्त औषधांपैकी एक ‘हायड्रोऑक्सिरिया’ हे औषध कॅन्सरविरोधी एजंटच्या रूपात वापरले जाते.

कोणत्याही अधिकृत स्वीकृतीशिवाय ‘एससीए’ उपचारातही त्याचा उपयोग केला जातो. मात्र, आता सिकल सेल अ‍ॅनिमिया च्या उपचारासाठी ‘हायड्रॉक्सियुरिया’च्या वापरास ड्रग्स कंट्रोलर जनरलकडून मान्यता मिळाली आहे. त्याचा लाभ देशातील अनेक रुग्ण मुलांना होऊ शकतो.

Back to top button