100 वर्षांच्या अ‍ॅक्वेरियममध्ये 92 वर्षांचा मासा!

100 वर्षांच्या अ‍ॅक्वेरियममध्ये 92 वर्षांचा मासा!
Published on
Updated on

सॅन फ्रॅन्सिस्को : एका अ‍ॅक्वेरियममध्ये राहणार्‍या एका माशाचे वय अंदाजापेक्षाही अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. कॅलिफोर्निया अकादमी ऑफ सायन्सच्या डीएनए विश्लेषणानुसार, सॅन फॅ्रन्सिस्को येथील स्टीनहार्ट अ‍ॅक्वेरियममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियन लंगफिश मेथुसेलाह 92 वर्षांचे असल्याचे आढळले. यापूर्वी हा मासा 84 वर्षांचा असावा, असे मानले जात होते. मात्र, अ‍ॅक्वेरियममधील सर्वात ज्येष्ठ मासा 92 वर्षांचा असल्याचे कळाल्यानंतर स्टीनहार्ट अ‍ॅक्वेरियमचे कर्मचारी उत्साहित झाले. कारण याच महिन्याच्या उत्तरार्धात हे अ‍ॅक्वेरियम शतक साजरे करणार आहे.

मेथूसलाहला 1938 मध्ये सॅन फॅ्रन्सिस्कोतील अ‍ॅक्वेरियममध्ये आणले गेले. त्यासह ऑस्ट्रेलिया व फिजीमधून 200 हून अधिक मासेही येथे आणले गेले. पण जसे वय वाढत गेले, तसे मेथूसलाह अधिक चर्चेत राहिले. स्टीनहार्टमधील याशिवाय आणखी दोन माशांचे वयही अनुक्रमे 54 व 54 वर्षे इतके असल्याचे यावेळी आढळून आले आहे. आता एखाद्या माशाच्या वयाचा अंदाज लावणे कठीण होते. कारण या प्रक्रियेत त्यांना इजा होण्याचा धोका असतो; पण नव्या प्रक्रियेत अर्ध्या मिलिमीटरपेक्षाही कमी फिन क्लिपच्या माध्यमातून ही प्रक्रिया विनासायास केली जाते. संशोधकांनी या अभ्यासात मिथाईलेशनचा शोध घेतला. एक छोटा अणू ज्याला मिथाईल समूह म्हटले जाते, डीएनएमध्ये काही बिंदूत चिकटून राहतो. एखाद्या जीवाचे वय वाढत असताना या बिंदूंमध्ये मिथायलेशनचा दरही वाढत जातो.

ऑस्ट्रेलियन लंगफिश 4 फुटांहून अधिक आकाराचे असून त्याचे सरासरी वजन 20 किलोंच्या आसपास असते. याचे सर्वसाधारण आयुष्य सरासरी 20 ते 25 वर्षे इतके असते; पण यानंतरही काही माशांना अधिक वयाचे वरदानच लाभलेले असते.

ऑस्ट्रेलियन लंगफिश हवेत श्वास घेण्यासाठी सक्षम असते. पाण्याची गुणवत्ता बदलली तर हे मासे आपल्या फुफ्फुसाचा वापर करतात. बहुतांश लंगफिशमध्ये दोन फुफ्फुसे असतात तर काही प्रजातीत केवळ एकच फुफ्फुस असते. ही प्रजाती 30 कोटी वर्षांहूनही अधिक जुनी असल्याचे मानले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news