85 year old skydiver | 85 वर्षांच्या ‘तरुण’ आजोबांची 15 हजार फुटांवरून गगनभरारी

85 year old skydiver |
85 year old skydiver | 85 वर्षांच्या ‘तरुण’ आजोबांची 15 हजार फुटांवरून गगनभरारी
Published on
Updated on

नवी दिल्ली : सामान्यतः 85 व्या वर्षात लोक आराम आणि शांत आयुष्य जगणे पसंत करतात. मात्र, एका जिद्दी आजोबांनी या विचाराला पूर्णपणे छेद दिला आहे. सोशल मीडियावर सध्या एका 85 वर्षीय आजोबांच्या साहसाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यातील त्यांचा जोश पाहून तरुणही थक्क झाले आहेत. तब्बल 15 हजार फूट उंचीवरून ‘स्कायडायव्हिंग’ करणार्‍या या आजोबांच्या आत्मविश्वासाने इंटरनेटवर सर्वांची मने जिंकली आहेत.

व्हिडीओच्या सुरुवातीला आजोबा पूर्ण उत्साहात दिसत आहेत. जेव्हा त्यांचा नातू त्यांना विचारतो की, ‘आकाशातून उडी मारताना भीती तर वाटणार नाही ना?’, तेव्हा ते अतिशय बेफिकीरपणे उत्तर देतात की, ‘मला घाबरणे ठाऊकच नाही.’ त्यांचा हा आत्मविश्वास पाहून आसपासचे लोकही चकित होतात. वयाच्या या टप्प्यावर अशी हिंमत दाखवणे सोशल मीडिया युजर्सना खूप प्रभावित करत आहे. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी आजोबा अतिशय सक्रिय दिसत होते. त्यांची ऊर्जा पाहून तेथील काही महिलांनी ‘वॉव’ म्हणत त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले. यानंतर आजोबा ट्रेनरसोबत विमानात बसले. विमान उंचीवर पोहोचताच दरवाजा उघडला आणि ट्रेनरसह आजोबांनी आकाशातून झेप घेतली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतक्या उंचीवरही आजोबांच्या चेहर्‍यावर भीतीचा लवलेश नव्हता; उलट ते मोठ्या आत्मविश्वासाने कॅमेर्‍याकडे पाहत होते. हवेमध्ये 15 हजार फूट उंचीवर तरंगतानाही आजोबांचा उत्साह कमी झाला नाही. ते आरामात कॅमेर्‍यासमोर बोलताना दिसले. स्कायडायव्हिंग पूर्ण झाल्यावर त्यांनी नियमांनुसार पाय दुमडून सुरक्षित ‘लँडिंग’ देखील केले. खाली आल्यावर जेव्हा नातवाने पुन्हा भीतीबद्दल विचारले, तेव्हा त्यांचे उत्तर तेच होते, ‘मला कशाचीही भीती वाटत नाही. हा रोमांचक व्हिडीओ ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) @saurabh23934844 नावाच्या युजरने शेअर केला आहे. ‘15 हजार फुटांवरून आजोबांची स्कायडायव्हिंग’ या कॅप्शनसह पोस्ट केलेल्या या रीलने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अनेक युजर्सनी कमेंट करत म्हटले आहे की, ‘खरी हिंमत वय नाही, तर तुमचा आत्मविश्वास ठरवतो’ आणि आजोबांनी हे सिद्ध करून दाखवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news