रेल्वे रुळावर बसले होते दहा सिंह आणि…

रेल्वे रुळावर बसले होते दहा सिंह आणि…

अहमदाबाद : गुजरातच्या अमरेली जिल्ह्यामध्ये मालगाडीच्या चालकाने आपल्या हुशारीने 10 सिंहांचा जीव वाचवला आहे. पश्चिम रेल्वे (डब्ल्यूआर) च्या भावनगर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेचालक पिपावाव बंदरगाह स्टेशनमधून साईडिंगपर्यंत मालगाडीचे संचालन करत होते. त्यांनी पाहिले की, 10 सिंह रेल्वे ट्रॅकवर बसून आराम करीत आहेत. हे पाहताच चालकाने लगेच आपत्कालीन ब्रेक लावून मालगाडी थांबवली. त्यांनी तोपर्यंत वाट पाहिली जोपर्यंत ते सिंह रेल्वे ट्रॅकच्या खाली उतरले नाहीत. यानंतर त्यांनी मालगाडीला गंतव्यापर्यंत पोहोचवले. रेल्वे अधिकार्‍यांनी चालकाच्या या धाडसी कार्याची प्रशंसा केली.

पश्चिम रेल्वेकडून सांगितले गेले आहे की, 'सिंहांसोबत इतर वन्यजीवांच्या रक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी या भावनगर डिव्हिजनद्वारे सतत प्रयत्न केले जात आहेत. निर्देशानुसार, या मार्गावर लोको पायलट सतर्क राहतात. तसेच निर्धारित गतिसीमानुसार रेल्वे चालवतात.' पिपावाव बंदरगाहला उत्तर गुजरातशी जोडणार्‍या या रेल्वेलाईनवर मागील काही वर्षांमध्ये अनेक सिंहांचा मृत्यू झाला आहे. हे बंदरगाह गिर वन्यजीव अभयारण्याच्या बाहेरील परिघापासून बरेच दूर स्थित आहे; पण अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह नियमित या क्षेत्रामध्ये येतात. त्यामुळे या ठिकाणातून रेल्वे चालवत असताना काळजी घ्यावी लागते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news