दहा वर्षांची कोट्यधीश उद्योजिका | पुढारी

दहा वर्षांची कोट्यधीश उद्योजिका

सिडनी : वयाच्या दहाव्या वर्षीच यशस्वी उद्योजिका बनणे हे स्वप्नवतच वाटू शकेल. मात्र, ऑस्ट्रेलियातील दहा वर्षांची पिक्सी कर्टिस नावाची मुलगी अशी कोट्यधीश उद्योजिका बनलेली आहे. प्राथमिक शाळेत शिकणार्‍या या मुलीची ‘पिक्सिज फिजेटस्’ नावाची कंपनी आहे. यामधून ती कोट्यवधी रुपयांची कमाई करते. या कामात तिला तिची आई रॉक्सी मदत करते आणि ती जनसंपर्क व्यवस्थापिकाही आहे.

रॉक्सी आणि पिक्सी यांनी मे महिन्यात टॉय बिझनेस म्हणजेच खेळण्यांचा व्यवसाय सुरू केला. त्यांची सर्व खेळणी 48 तासांच्या आतच विकली गेली होती आणि हे त्यांना मिळालेले पहिले यश होते. रॉक्सीने सांगितले की कंपनीचा पहिल्या महिन्याचा टर्नओव्हर एक कोटीहून अधिक होता. त्यानंतर पिक्सीच्या कंपनीमार्फत हेअर अ‍ॅक्सेसरी ब—ँडही तयार करण्यात आला.

त्याचे नाव ‘पिक्सिज बोज’ असे ठेवण्यात आले. खेळणी आणि हेअर अ‍ॅक्सेसरीजचे ब—ँड ‘पिक्सिज पिक्स’ या मातृ कंपनीच्या अंतर्गत येतात. यामध्ये खेळणी, कपडे आणि अ‍ॅक्सेसरीज विकले जातात. या सर्वांवर दहा वर्षांच्या पिक्सीचे ‘अ‍ॅप्रुव्हल’ असते. रॉक्सी स्वतः ‘स्विटी बेट्टी पीआर’ नावाचा व्यवसाय चालवते. यामध्ये तिला तिचे पतीही मदत करतात.

Back to top button