वेब पेजचा कंटेट वाचण्यासाठी ‘गुगल’चे भन्नाट फीचर

वेब पेजचा कंटेट वाचण्यासाठी ‘गुगल’चे भन्नाट फीचर

वॉशिंग्टन : गुगलने आपल्या यूझर्सच्या इंटरनेट एक्सपीरियन्समध्ये एक उत्तम फीचर आणले आहे. 'लिसन टू दिस पेज' असे या फीचरला नाव देण्यात आले आहे. या फीचरचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामुळे वेब पेजचा कंटेंट यूझरच्या आवडीच्या भाषेत आणि आवाजात ऐकू येतो. हे फीचर आल्याने यूझर्सला लाँग कंटेंट वाचण्यासाठी जास्त वेळ अँड्रॉईड फोन स्क्रीनकडे पाहावे लागणार नाही. यूझर्सना हँडफ्री अनुभव देणारे हे फीचर रोलआऊट सुरू झाले. लवकरच हे फीचर क्रोमच्या सर्व यूझर्सपर्यंत पोहोचेल.

गुगलने हेल्प पेजच्या माध्यमातून हे नवे फीचर सादर केले आहे. कंपनीने सांगितले की, आता यूझर्स वेबसाईटवर वाचलेला मजकूर त्यांच्या अँड्रॉईडवर ऐकू शकतात. यासाठी प्ले, पॉज, रिविंड आणि फास्ट फॉरवर्ड असे पर्यायही देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यूझर्स त्यांच्या गरजेनुसार कंटेंटचा प्लेबॅक स्पीड कमी किंवा वाढवू शकतात. याशिवाय गुगल यूझर्सला आवडीचा व्हॉईस निवडण्याचा पर्यायही देत आहे. यामध्ये अधिक सानुकूलित अनुभवासाठी आपल्याला टेक्स्ट हायलाईटिंग ऑन किंवा ऑफ आणि ऑटो स्क्रोल फीचरदेखील चालू किंवा बंद करावे लागेल. व्हॉईस प्रकार निवडण्यासाठी तुम्हाला रुबी, रिव्हर, फिल्ड आणि मॉसचा पर्याय मिळेल.

भाषेबद्दल बोलायचे झाले, तर यात इंग्रजी, हिंदी, बंगाली, अरबी, चायनीज, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, जपानी, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश असे पर्याय देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, गुगल क्रोमचे हे फीचर त्याच वेबसाईटवर काम करेल जे त्याला सपोर्ट करेल. गुगलने डेस्कटॉपसाठी या फीचरची टेस्टिंग केली आहे. आशा आहे की, लवकरच ते डेस्कटॉपसाठीदेखील रीलिज केले जाईल. हे फीचर वापरण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉईड डिव्हाईसवर गुगल क्रोम ओपन करा. आता तुम्हाला ज्या वेब पेजवर ऐकायचे आहे त्यावर जा. उजव्या कोपर्‍यात असलेल्या थ्री-डॉट मेनूवर टॅप करा. येथे 'लिसन टू दिस पेज' हा पर्याय निवडा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पॉडकास्ट स्टाईलमध्ये वेब पेजवरील मजकूर ऐकायला सुरुवात होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news