‘ती’ बारा दिवसांत 1,000 कि.मी. धावली!

‘ती’ बारा दिवसांत 1,000 कि.मी. धावली!

सिंगापूर : अवघ्या 12 दिवसांत तब्बल 1 हजार कि.मी. धावून नवा विक्रम प्रस्थापित करणार्‍या नताली डाऊ हिला आता गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्राचे वेध लागले आहेत. थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर असा मोठा प्रवास नताली डाऊने केवळ 12 दिवसांत पूर्ण केला आहे. या काळात तिला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले. कडक उन्हाचा सामना करताना डाऊचे शूजही वितळले होते. 52 वर्षीय डाऊ हिचा हा ऐतिहासिक प्रवास 5 जून रोजी सिंगापूरमध्ये संपला.

याबाबत बोलताना नताली डाऊ म्हणाली, 'चार दिवसांत आज पहिल्यांदाच मी हे काम पूर्ण केले आहे का? असा प्रश्न मलाच पडला आहे. मला क्रीडा क्षेत्राशी निगडित आव्हाने आवडतात; परंतु कधी कधी उद्भवणार्‍या समस्यांमुळे माझ्या या कामात अनेक अडथळे मला पार करावे लागले. तुम्ही पहिले आलात की शेवटचे, याने काही फरक पडत नाही. तुम्ही असे काही तरी केले आहे जे जगातील 0.05 टक्के लोक कधीही करू शकणार नाहीत.' नतालीला धावताना 35 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागला.

या कडक उन्हात पहिल्याच दिवसापासून तिला पाठीच्या दुखण्याने ग्रासले होते, तर प्रचंड उन्हामुळे तिचे बूटही वितळले होते. एवढेच नाही, तर तिसर्‍या दिवशीच तिला यूटीआयचादेखील त्रास झाला होता.मात्र, ती थांबली नाही. नताली डाऊने ग्लोबल चॅरिटी 'जीआरएलएस'साठी 50 हजार डॉलरपेक्षा अधिक निधी या धावण्यातून उभारला आहे. या रकमेमुळे महिलांना खेळातून त्यांची कौशल्ये विकसित करण्यास मदत होणार आहे. या प्रवासादरम्यान, डाऊने दररोज किमान 84 कि.मी. अंतर कापले. या काळात ती तिच्या सहकार्‍यांशी सतत संपर्कात राहिली. याशिवाय तिच्या सुरक्षेत आणि यशात तिच्या टीमचाही मोठा वाटा असल्याची भावना तिने व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news