जगातील सर्वात खतरनाक कारागृह!

जगातील सर्वात खतरनाक कारागृह!
Published on
Updated on

टेकोल्युका : जगभरात जसजसे गुन्हे वाढत जातात, तसतसे सुरक्षित व भरभक्कम कारागृहांची गरज भासू लागते. काही देशांमध्ये या द़ृष्टीने यापूर्वीपासूनच अंमलबजावणी केली गेली आहे. मध्य अमेरिकेत अल सल्वादोर देशात खास प्रकारचे भरभक्कम जेल तयार केले गेले असून याची क्षमता 40 हजार कैद्यांना सामावून घेण्याची आहे; मात्र या कारागृहात ज्याप्रकारे ठेवले जाते, ते कडक शिक्षेहूनही अधिक वाईट अनुभव देणारे असते. कारण, येथे पूर्ण रात्र चक्क एका लोखंडाच्या पट्टीवर काढावी लागते.

टेकोल्युको शहरात टेरिरिजम कन्फाईमेंट सेंटरची उभारणी झाली आहे. याची निर्मिती 2023 मध्ये पूर्ण झाली होती. या देशात प्रारंभी गुन्ह्यांचे प्रमाण अतिशय कमी होते. राष्ट्रपती नाएब बुकेले यांनी देशातील अपराध कमी करण्याचा पण उचलला होता. नार्को गँग नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, त्यावेळी देशभरातून जवळपास 70 हजारांहून अधिक जणांना जेरबंद करण्यात आले. यातील बहुतांशी कैद्यांना या कारागृहात डांबून ठेवण्यात आले.

एखाद्या किल्ल्यासारख्या अभेद्य असलेल्या या कारागृहात 24 तास कृत्रिम वीजपुरवठा सुरू असतो. अगदी सूर्यप्रकाश देखील पोहोचू शकत नाही, इतकी येथील सुरक्षाव्यवस्था कडक आहे. साहजिकच, कैद्यांना सूर्याचे दर्शन देखील होत नाही. कैद्यांना अंडी, पाश्तासारखा आहार दिला जातो. मात्र, हे सर्व त्यांना हातानेच खावे लागते. कोणांवर हल्ला करणे शक्य होऊ नये, यासाठी त्यांना चाकू-सुरी दिली जात नाही. लोखंडी पट्ट्यावर झोपणे ही मात्र सर्वात मोठी शिक्षा असल्याचे आवर्जून सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news