असा देश, जिथे दिवस-रात्र सुरू असते टीव्ही, लाईट

असा देश, जिथे दिवस-रात्र सुरू असते टीव्ही, लाईट

येओंगप्योंग-दक्षिण कोरिया : जगात शेकडो देश आहेत आणि त्यांची स्वतःची संस्कृती आहे, अशी काही ठिकाणं आहेत जिथे लोकांचे जीवन सामान्य लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. असेच एक ठिकाण आहे, जिथे लोक शांत झोपत नाहीत. रात्रीही त्यांच्या घरातील वीज आणि लाईट सुरूच ठेवली जाते आणि ते ही सुरक्षिततेच्या कारणास्तव.

सामान्यपणे झोपताना आपण लाईट बंद करतो. लाईट बंद करून टीव्ही पाहतो. कधीतरी टीव्ही पाहता पाहता झोप लागते आणि टीव्ही चालूच असतो. पण एक असे ठिकाण आहे, जिथे मुद्दामहून लाईट आणि टीव्हीही रात्रभर चालू ठेवला जातो. या ठिकाणाचं नाव येओंगप्योंग असे आहे. हे दक्षिण कोरियातील एक छोटेसे बेट आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, येओंगप्योंग या छोट्या बेटाच्या लोकांच्या जीवनात अजिबात शांतता आणि आनंद नाही. त्यांना सतत सतर्क रहावे लागते. हे बेट दक्षिण कोरियाचा शत्रू देश उत्तर कोरियापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर आहे. या वर्षी जानेवारीमध्ये उत्तर कोरियाकडून इथे गोळीबार झाला असल्याने लोक सतत सतर्क असतात. हल्ल्यांपासून वाचण्यासाठी त्यांनी बॉम्ब शेल्टर्समध्ये आश्रय घेतला होता.

2010 मध्ये या संपूर्ण बेटावर बंकर बांधण्यात आले. आठवडाभराच्या जेवणाची सोय, वैद्यकीय सुविधा, बेडिंग, शॉवर आणि गॅस मास्कसह मोठे स्क्रीन देण्यात आले आहेत. ज्या दिवशी नॉर्थ कोरियाला वाटेल त्या दिवशी एका हल्ल्यात ते हे संपूर्ण बेट उद्ध्वस्त करू शकतात, अशी इथे राहणार्‍या लोकांना भीती वाटते आणि त्यामुळेच ते इतकी काळजी घेऊन असतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news