बोटांनी नव्हे, चक्क नाकाने टायपिंगचा विश्वविक्रम!

बोटांनी नव्हे, चक्क नाकाने टायपिंगचा विश्वविक्रम!

नवी दिल्ली : विक्रम कोणताही असो, तो साकारणे अजिबात सोपे असत नाही. त्यामागे बरीच मेहनत असते. त्यातही विश्वविक्रमासाठी तर आणखी कष्ट घ्यावे लागतात, पण काही विश्वविक्रम निव्वळ अचाट करणारे असतात. ते इतके अनोखे असतात की त्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण असते. त्यातच जगात अनोखी कामगिरी करीत वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणार्‍यांच्या यादीत आणखी एका भारतीय व्यक्तीचे नाव समाविष्ट झाले असून या व्यक्तीने हाताच्या बोटांनी नाही, तर चक्क नाकाने अवघ्या 25.66 सेकंदांत कॉम्प्युटरच्या की-बोर्डवरील अल्फाबेटस् टाईप करून नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.

यासंबंधीचा एक व्हिडीओ आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्ने त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर विश्वासही बसणार नाही की, अशा प्रकारेही कोणी टायपिंग करू शकेल. नाकाने टायपिंग करून वर्ल्ड रेकॉर्ड करणार्‍या या व्यक्तीचे नाव विनोद कुमार चौधरी (वय 44), असे आहे. यापूर्वी 2023 मध्येही त्याने नाकाने की-बोर्डवरील अल्फाबेटस् टाईप करण्याचा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' बनवला होता. यावेळी त्याला 27.8 सेकंदांचा वेळ लागला होता. त्याच वर्षी त्याने 26.73 सेकंद वेळेसह पुन्हा आपला विक्रम मोडला. याच विनोद कुमारने आता तिसर्‍यांदा नाकाने की-बोर्डवरील अल्फाबेटस् टायपिंग करण्याचा स्वत:चा रेकॉर्ड मोडला आहे. त्याने आता 25.66 सेकंदांत ही अविश्वसनीय कामगिरी केली.

रेकॉर्डच्या नियमांनुसार, चौधरी यांना रोमन वर्णमालेतील सर्व 26 अक्षरं मानक क्यूआरटी की-बोर्डवर टाईप करायची होती; ज्यामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये एक स्पेस ठेवायचा होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'ने व्हिडीओ केला शेअर 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्'ने 'एक्स'वर या रेकॉर्डचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news