‘नासा’ बनवत आहे चंद्रासाठीचे घड्याळ

‘नासा’ बनवत आहे चंद्रासाठीचे घड्याळ

वॉशिंग्टन : आपल्या ब्रह्मांडातील विचित्रता ही 'टाईमकिपिंग'मध्ये असलेली सर्वात मोठी त्रासाची गोष्ट आहे. त्यामध्ये पृथ्वीवरील दर्‍यांच्या तुलनेत एखाद्या पहाडावर सेकंद अतिशय वेगाने जातो. व्यावहारिक जीवनात या फरकाबाबत चिंता करण्याची गरज नसते. मात्र, स्पेस रेसच्या काळात हे महत्त्वाचे ठरते. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये अशी स्पेस रेस सुरू आहे.

दोन्ही देश चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याची इच्छा बाळगून आहेत. अशा वेळी वेळेबाबतची ही विचित्रता सर्वात मोठी समस्या बनून समोर आली आहे. याचे कारण म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीचा एक दिवस आपल्या वेळेच्या 56 मायक्रोसेकंदाने लहान असतो. ही एक अशी संख्या आहे, जी दीर्घ काळात अनेक विसंगतींना जन्म देते. त्यामुळे सध्या 'नासा' खास चंद्रासाठी घड्याळ बनवत आहे.

'नासा' आणि त्याचे सहयोगी सध्या या समस्येवर उपाय शोधत आहेत. 'नासा'च्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये चंद्राची स्थिती, नेव्हीगेशन आणि वेळ व मानकांबाबतच्या विषयाचे प्रमुख चेरील ग्रॅमलिंग यांनी सांगितले, वैज्ञानिक चंद्रावर केवळ एक नवे टाईम झोनच बनवण्याचा प्रयत्न करीत आहे असे नाही, तर स्पेस एजन्सी एक पूर्णपणे नवे टाईम स्केल किंवा मोजमाप प्रणाली बनवू इच्छिते. चंद्रावर सेकंद अतिशय वेगाने चालतो, हे लक्षात घेऊन त्याची निर्मिती करण्यात येईल.

स्पेस एजन्सीचे लक्ष्य विशेषत्वाने चंद्रासाठी वेळेवर नजर ठेवण्याची एक नवी पद्धत स्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांसह काम करणे हे आहे. 'व्हाईट हाऊस'ने 'नासा'ला 31 डिसेंबरपर्यंत या नव्या टाईम स्केलसाठी आपली योजना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 2026 पर्यंत ही सिस्टीम लागू करण्याची योजना आहे. त्याच वर्षी अमेरिकेचे अंतराळवीर चांद्रभूमीवर उतरतील, अशी अपेक्षा आहे. 'अपोलो' मोहिमांनंतर आता पन्नास वर्षांनी माणसाचे पाऊल चंद्रावर पडणार आहे. त्यासाठी वेळेकडेही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news