मालकिणीला पोपट म्हणतो, ‘मम्मी, चाय लाव..!’

मालकिणीला पोपट म्हणतो, ‘मम्मी, चाय लाव..!’
Published on
Updated on

नवी दिल्ली : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यावर अनेक युजर आपली कमेंट व्यक्त करत असतात. आता सोशल मीडियावर एका पोपटाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एखाद्या मानवाप्रमाणे पोपट बोलत असताना दिसत आहे. व्हिडीओमधील हा पोपट विदेशी अतिशय सुंदर आहे. त्याच्या मालकिणीशी गप्पा चांगल्या रंगल्या आहेत. विशेष म्हणजे घरातील मुलांचे ऐकून हा पोपटही महिलेस 'मम्मी'च म्हणतो! 'मम्मी, चाय लाव!' अशी मागणीही तो करतो!

2 मिनिटे 11 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. घरातील एखाद्या मुलाने आईकडे हट्ट धरावा, त्या पद्धतीने हट्ट पोपटाने धरला आहे. हा व्हिडीओ चांगला व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकरी आपली कमेंटही व्यक्त करत आहेत. विदेशी पोपट हिंदीत बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो पोपट मालकिणीला 'मम्मी' म्हणून बोलावतो. तसेच तो चहाची मागणी करताना दिसत आहे. हा पोपट सुंदर, लाल रंगाचा असून त्याची पिसे हिरवी आहेत.

पोपटाच्या हाकेने ती स्त्रीही बाहेर येते आणि त्याच्याशी बोलते. दोघांमधील संवाद लोकांच्या मनाला भिडणारा आहे. इंडोनेशियामध्ये या प्रकारचे पोपट आढळतात. हा पोपट महिलेला हाक मारताच, 'आयी बेटा आयी' म्हणत ती आई त्याला उत्तर देत आहे. 'मी चहा घेऊन येत आहे,' अशी ती त्या पोपटाला म्हणते. त्यावेळी आई प्रेमाने म्हणते, 'या माझ्या मुलासारखा-सोन्यासारखा दुसरा मुलगा नाही.' आईचा हा गोड मुलगा आहे!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news