कडक उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिणे धोकादायक | पुढारी

कडक उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिणे धोकादायक

मेक्सिको : उन्हाळ्यात सातत्याने तहान लागते. किंबहुना जितके पाणी आपण पितो, तितके कमीच इतकी उष्णता असते. कडक उन्हातून घरी पोहोचल्यानंतर बर्‍याच जणांना घटघट पाणी पिण्याची सवय असते. पण, तज्ज्ञांच्या मते उन्हातून आल्यानंतर लगेच अशा पद्धतीने पाणी पिणे धोकादायक असते.

तसे पाहता, निरोगी राहण्यासाठी कोणत्याही ऋतूत पाणी पिणे महत्त्वाचेच. उन्हाळ्यात तर जास्त पाणी प्यावे; कारण उष्णता वाढल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते. अशा परिस्थितीत शरीराला थंड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पण, ज्यावेळी कडक उन्हातून आपण घरी परततो, त्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

तज्ज्ञ सांगतात, त्यानुसार कडक उन्हातून घरी परतल्यानंतर काही काळ विश्रांती घेणे महत्त्वाचे ठरते. त्यानंतर शरीर थंड झाल्यावरच पाणी प्यावे. पण, शक्यतो थंड पाणी पिणे टाळायला हवे. सुरुवातीला कोमट पाणी घेतल्यास शरीराचे तापमान नियंत्रणात राहते व पचनक्रियाही चांगली राहते. उन्हातून घरी आल्यानंतर एकाचवेळी जास्त पाणी न पिता थोडे थोडे पाणी प्यावे.

संबंधित बातम्या

कडक उन्हातून परतल्यावर लगेच पाणी पिल्यास यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास वाढू शकतो. उन्हातून घरी आल्यानंतर काही वेळ बसून राहिल्यास शरीराचे तापमान सामान्य पातळीवर येईल. त्यानंतर पाणी घेता येईल. शक्यतो पंधरा मिनिटांनीच पाणी प्या. उशिराने पाणी प्यायल्यास सर्दी, संसर्ग आणि चक्कर येण्याचा धोका राहत नाही.

Back to top button