समुद्रात बुडालेल्या मोठ्या भूखंडाचा शोध

समुद्रात बुडालेल्या मोठ्या भूखंडाचा शोध

सिडनी : संशोधकांनी आता प्राचीन काळात समुद्रात बुडालेल्या एका मोठ्या भूखंडाचा शोध लावला आहे. हा भूखंड सध्याच्या ऑस्ट्रेलियाजवळ पॅसिफिक महासागरात होता. सुमारे 70 हजार वर्षांपूर्वी मानवी इतिहासातील एक असामान्य स्थलांतर झाले होते. त्यावेळी एक मोठी लोकसंख्या आग्नेय आशियातून ऑस्ट्रेलिया खंडात गेली होती. हे तेच लोक आहेत ज्यांना आधुनिक ऑस्ट्रेलियाचे मूळ निवासी म्हटले जाते. या लोकांनी हजारो वर्षांपूर्वी इतका दीर्घ प्रवास कसा केला असावा हे कोडे संशोधकांना पडले होते. आता त्यांना समजले आहे की त्या काळात असलेल्या एका विशाल भूखंडाच्या मार्गे त्यांनी हा प्रवास केला होता.

'नेचर कम्युनिकेशन' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, 70 हजार वर्षांपूर्वी ज्यावेळी पृथ्वी अंतिम हिमयुगाच्या मध्यकाळात होती, त्यावेळी ऑस्ट्रेलियाजवळ साहुल नावाचे एक मोठे क्षेत्र होते. त्यावेळी समुद्राचा जलस्तर कमी होता आणि ऑस्ट्रेलिया उत्तरेत पापुआ न्यू गिनी आणि दक्षिणेत टास्मानियाशी जोडलेला होता. हिमयुगानंतर वैश्विक तापमानात वाढ झाली व समुद्राचा जलस्तर वाढला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची मुख्य भूमी वेगळी झाली.

संशोधकांच्या मते, न्यू गिनी सुमारे 8 हजार वर्षांपूर्वी तर टास्मानिया सुमारे 6 हजार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियापासून वेगळे झाले. संशोधकांनी याबाबतचे एक मॉडेल विकसित केले आहे. त्यामध्ये आग्नेय आशियाच्या दोन स्थानांना पश्चिम पापुआ आणि तिमोर सागर शेल्फसह आधुनिक परिदृश्यांमध्ये फैलावलेल्या पुरातत्त्वीय स्थळांपासून आग्नेय आशिया ते ऑस्ट्रेलियाच्या संभाव्य प्रवास मार्गांना समाविष्ट केले आहे. सिडनी युनिव्हर्सिटीतील जियोसायन्सेज स्कूलमधील प्राध्यापक व या संशोधनाचे प्रमुख संशोधक ट्रिस्टन सॅलेस यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी आखेटक समुदायाने कुठून साहुल पार केले होते हे दर्शवले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news