…अन् शतकापूर्वी गायब जहाजाचे गुपित उलगडले!

…अन् शतकापूर्वी गायब जहाजाचे गुपित उलगडले!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : आजवर अथांग समुद्राचा जसा पुरेसा अभ्यास मनुष्याला करता आलेला नाही, त्याचप्रमाणे अशा समुद्रात काही जहाजे बुडाली, त्यांचा पत्ताही कधीच लागला नाही. 115 वर्षांपूर्वी अमेरिकेचेही एक असेच जहाज बुडाले होते, ज्याचा आजवर काहीच पत्ता लागत नव्हता. मात्र, आता शतकभरानंतर या जहाजाची काही छायाचित्रे उपलब्ध झाली असून हे जहाज शापित जहाज म्हणून का ओळखले गेले, त्याचाही उलगडा होतो आहे.

डेली स्टार न्यूज वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सन 1894 मध्ये शोर्स लंबर कंपनीने अमेरिकेच्या मिशिगनमध्ये जिब्राल्टर इथं एडेला शोर्स नावाचे एक जहाज तयार केले होते. या जहाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे नाव कंपनीच्या मालकाच्या मुलीच्या नावावरून ठेवण्यात आले होते. 735 टन वजन असलेली लाकडाची स्टीमशिप जेव्हा प्रवासासाठी निघाली तेव्हा त्यात 14 प्रवासी होते. 15 वर्षांच्या काळात 195 फूट लांबीचे हे जहाज आणखी 2 वेळा बुडाले होते. त्या वेळी नावाड्यांनी सुद्धा हे जहाज शापित असल्याचे म्हटले होते.

29 एप्रिल 1909 रोजी मिनिसोटा इथे जाण्यासाठी हे जहाज निघाले. तेव्हा त्या जहाजावर मिठाची पोती ठेवण्यात आली होती. पुढे दोनच दिवसांत म्हणजे, 1 मे 1909 रोजी हे जहाज अचानक गायब झाले. ते जहाज मिशिगनच्या व्हाइटफिश पॉइंट इथून पुढे कुठेच आढळून आले नाही. 2021 मध्ये म्हणजे तब्बल 115 वर्षांनी या जहाजाचा मलबा समुद्राच्या तळाशी 650 फूट खोलात सापडला. हे जहाज अगदी शेवटच्या ज्या ठिकाणी पाहिले गेले, त्या जागेपासून हे जवळपास 64 किलोमीटर लांब अंतरावर सापडले, हे आणखी एक आश्चर्य. ग्रेट लेक्स शिपरॅक हिस्टोरिकल सोसायटीला या जहाजाचा मलबा मिळाला होता.

ज्या काळात या जहाजाची निर्मिती झाली होती, त्या वेळी नवीन जहाजावर वाइनच्या बाटल्या फोडण्याची एक परंपरा होती. हे जहाज तयार करणार्‍या कंपनीचे मालक आणि त्यांच्या कुटुंबातले सदस्य मद्यपान करत नसत. त्यामुळे त्यांनी मद्याच्या बाटल्यांऐवजी त्या जागी पाण्याच्या बाटल्या जहाजावर फोडल्या. एडेलाची बहीण बेसी हिने या बाटल्या फोडल्या होत्या. ही परंपरा नीट पाळली न गेल्याने हे जहाज शापित झाले आहे, असे तेव्हापासून मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news