अंतराळात अनोखा पल्सर तारा! | पुढारी

अंतराळात अनोखा पल्सर तारा!

वॉशिंग्टनः अंतराळाच्या अनंत पसार्‍यात अनेक रहस्य लपलेली आहेत. ब्रह्मांडामधील अनेक गूढ अद्याप समोर आलेली नाहीत. जगभरातील अनेक खगोलशास्त्रज्ञांकडून याबाबत संशोधन सुरु आहे. खगोलशास्त्रज्ञांनी अशाच एका अनोख्या तार्‍याचा शोध लावला आहे. हा एक ’न्यूट्रॉन स्टार’ किंवा ’डेट स्टार’ असं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे असा तारा करोडो वर्षांनंतर एखाद्या वेळी तयार होतो, त्यामुळे हा तारा खूप खास आहे. शास्त्रज्ञांनी या नवीन तार्‍याचं नाव’जे1912-4410’ असं ठेवलं आहे. हा एक खास प्रकारचा पल्सर तारा असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

असा तारा दिसणंही खूप कठीण आहे. हा पल्सर तारा फारच दुर्मिळ प्रक्रियेने तयार होतो. ही प्रक्रिया फारच अनोखी आहे. शास्त्रज्ञांनी शोधलेला हा नवीन पल्सर तारा आपल्या आकाशगंगेपासून 773 प्रकाशवर्षे दूर आहे. पल्सर तारा एक प्रकारचा न्यूट्रॉन तारा असतो. जेव्हा एखादा न्यूट्रॉन तारा स्वतःच्या आकारमानामुळे आणि वजनामुळे संकुचित होतो तेव्हा पल्सर तारा तयार होतो. एखादा न्यूट्रॉन तारा अशा प्रकारे संकुचित होतो, त्यानंतर लगेचच त्यामध्ये सुपरनोव्हा स्फोट होऊन पल्सर तारा जन्माला येतो.

Back to top button