Coconut cream : शहाळ्याची मलईही असते आरोग्यदायी | पुढारी

Coconut cream : शहाळ्याची मलईही असते आरोग्यदायी

नवी दिल्ली : उन्हाळ्यात तहान भागवणारे शहाळ्याचे गोड पाणी पिणे कुणाला आवडत नाही? आजारी माणसालाही Coconut cream असे पाणी नवी ऊर्जा देणारे असते. शहाळ्याचे पाणी पिल्यानंतर अनेक लोक आवर्जून त्यामधील मलईही खात असतात. ही मलई केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही गुणकारी आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. विशेषतः उन्हाळ्यात शरीरात थंडावा राहण्यासाठी ही मलई उपयुक्त ठरते.

नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी नारळ पाणी हा उत्तम स्रोत आहे. फक्त नारळपाणीच नाही तर त्यामधील मलई Coconut cream खाण्याचेही आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. नारळातील ही क्रीम किंवा मलईमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते. त्यामुळे आपल्याला पचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते.

मलईमध्ये Coconut cream अधिक कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी नारळपाणी प्यायल्यानंतर मलई खावी. शहाळ्यातील मलई ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास मदत करते. नियमित मलईचे सेवन केल्यास उष्णेतपासून आराम मिळतो. तज्ज्ञांनुसार एक व्यक्ती दररोज 40 ग्रॅम नारळाचे सेवन करू शकतो.

Back to top button