एलियन्स जांभळ्या रंगाचे असतील? | पुढारी

एलियन्स जांभळ्या रंगाचे असतील?

वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की, नाही याबाबत अजूनही विज्ञानाने ठामपणे सांगितलेले नाही. मात्र, तरीही अनेक लोक त्यांच्या अस्तित्वाबाबत वेगवेगळे दावे केले जात असतात. हे एलियन्स कसे दिसत असतील याची एक आपण कल्पनाच करून ठेवलेली आहे. सांगाड्यातील कवटीसारखे रूप असणारे एलियन्स असतील असे सर्वत्र दाखवले जात असते. त्यांचे रंगही वेगवेगळे दाखवले जात असतात. अर्थात या सर्व कल्पनाच आहेत! आता काही संशोधकांनी ते कसे दिसत असतील याची एक नवी कल्पना समोर आणली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एलियन्स जांभळ्या रंगाचे असू शकतात!

कॉनेल वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, जर एलियन्स पृथ्वीसारख्या ग्रहावर राहत असतील, तर तो ग्रहही आपल्या पृथ्वीसारखा हिरवा नसेल. तो वेगळा असेल आणि त्यामुळे एलियन्सही वेगळ्या रंगाचे असतील. एलियन्स हे जांभळ्या रंगाचे असू शकतात. याचे कारण ते बॅक्टेरियांनी आच्छादलेले असतील. ते अशा ठिकाणाहून येतील जिथे फार कमी किंवा कोणताही द़ृश्य प्रकाश असणार नाही. पृथ्वीवरही असे अनेक जीव आहेत ज्यांचा रंग जांभळा असतो. हे रंग अंतराळातही दिसतात.

रिसर्च टीमचे प्रमुख आणि कार्ल सगन इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डॉ. लिगिया फोंसेका कोएल्हो यांनी सांगितले की, जांभळे बॅक्टेरिया अनेक प्रकाराच्या स्थितीत वाढू शकतात. त्यामुळे ते कशाही स्थितीत जिवंत राहू शकतात. असे होऊ शकते की ते जगभरात पसरू शकतील. वैज्ञानिक अशा रंगांचा शोध घेत आहेत जे इतर ग्रहांवर असू शकतात. त्यांच्या माहितीनुसार जांभळा रंग हा प्राथमिक रंग आहे. त्याने टोमॅटो लाल, गाजर केशरी दिसण्यात मदत होते. त्याच्यामध्ये पिवळ्या, केशरी आणि लाल रंगाला बदलण्याची क्षमता आहे. वैज्ञानिकांच्या मते जांभळ्या रंगाचे बॅक्टेरिया झाडांच्या तुलनेत फार कमी प्रकाशातही जिवंत राहू शकतात. ते क्लोरोफिलच्या अनेक रूपांचा वापर करतात जे झाडांना सूर्यापासून मिळणार्‍या प्रकाशाला अन्नात बदलण्यात मदत करतात.

Back to top button