Aliens : एलियन्स गुपचूपपणे पृथ्वीवर येत असतील?

Aliens : एलियन्स गुपचूपपणे पृथ्वीवर येत असतील?
Published on
Updated on

न्यूयॉर्क : एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांबाबतचे अनेक दावे करण्यात येत असतात. अन्य ग्रहांवर आपल्यापेक्षाही प्रगत लोक राहत असतील असा आपण एक समजच करून घेतलेला आहे. या कल्पनेतून अनेक भन्नाट दावे होत असतात. विशेषतः एलियन हंटर्स म्हणजेच एलियनचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हौशी लोकांकडून तर असे अनेक दावे होतात. आता अशाच एका व्यक्तीने एलियन्स पृथ्वीवर येत असतील आणि येथील विज्ञान-तंत्रज्ञानाला पाहत असतील असा दावा केला आहे.

परग्रहवासीयांची अंतराळयाने म्हणजेच 'उडत्या तबकड्या' पाहिल्याचे दावेही अनेक ठिकाणाहून केले जात असतात. ब्रिटनमध्ये तर अडीच वर्षांच्या आत सुमारे एक हजार युफो पाहण्यात आल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे अमेरिकन सैनिक व पायलटांपासून ते बड्या प्राध्यापक-संशोधकांपर्यंत अनेक लोक एलियन्सच्या व युफोंच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात. आता इस्रायली-अमेरिकन अभ्यासक एवी लोएब यांनी एक दावा केला आहे. त्यांनी एका माहितीपटात दावा केला आहे की, युरोपमधील 'सर्न'मध्ये बनवण्यात आलेल्या हिडन डायमेंशनच्या मदतीने एलियन्स गुप्तपणे पृथ्वीवर आले असतील.

फ्रान्स-स्वित्झर्लंडच्या सीमेवर 'सर्न' ही प्रयोगशाळा आहे. तिथेच लार्ज हैड्रॉन कोलायडर हे महायंत्र असून त्यामधील प्रयोगातूनच देवकणांचे म्हणजे 'हिग्ज-बोसॉन' कणांचे अस्तित्व सिद्ध झाले होते. 'द पॅरानॉर्मल युफो कनेक्शन' माहितीपटात प्रा. लोएब यांनी सांगितले की, एलियन्स पृथ्वीपासून बरेच दूर असू शकतात. असंही शक्य आहे की ते अब्जावधी वर्षांपासून डायमेंशन होपिंग टेक्निकवर काम करीत असतील. जर एलियन्सची टेक्निक आपल्याकडे पोहोचली तर आपण अवाक होऊ, कारण ही आपल्याकडे असलेल्या तंत्रज्ञानापेक्षा खूप पुढची असेल. एलियन्स गुपचूपपणे पृथ्वीवर येत असतील आणि आपल्या सर्व तंत्रज्ञानाची, उपकरणांची माहिती घेत असतील. मनुष्यांकडून हिडन डायमेन्शनमधून प्रवास केल्यास टक्कर होण्याची शक्यता वाढू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news