नदीवर तरंगते इंद्रधनुष्य! | पुढारी

नदीवर तरंगते इंद्रधनुष्य!

बोगोटा : जगभरात अशा अनेक जागा आहेत, जे केवळ दुसर्‍या जगाचा भास करून देतात. कोलंबियातील एका नदीचाही यात समावेश असून, आश्चर्य म्हणजे या नदीत तरंगत्या इंद्रधनुष्याची प्रचिती येते. आता आजवर आपण इंद्रधनुष्य केवळ आकाशातच पाहिले आहेत, ते ही पावसावेळीच. त्यामुळे हे इंद्रधनुष्य नदीतील कसे, असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे.

आश्चर्य वाटेल, पण कोलंबियाची कॅनो क्रिस्टेल्स ही नदी पाच रंगांनी नटलेली आहे. नदीचे पाच वेगवेगळे रंग थक्क करायला लावणारे आहेतच. शिवाय, या पाच रंगांचे रहस्य काय, याची उत्सुकता वाढवणारेदेखील आहेत. नॅशनल जिओग्राफीनुसार, या नदीला गार्डन ऑफ ईडन म्हणजे देवदेवतांची बाग असे नाव दिले गेले आहे. याचे कारण म्हणजे जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत या नदीत एकूण पाच रंग दिसून येतात. पिवळा, हिरवा, निळा, काळा व लाल असे रंग या नदीत विखुरले गेलेले असतात. यामुळेच जागतिक स्तरावरील सर्वात सुंदर नदी म्हणून याचा उल्लेख होतो. या इंद्रधनुष्यी पाण्याला ‘लिक्विड रेनबो’ नावानेही ओळखले जाते.

Back to top button