चक्क एका गुहेत राहते संपूर्ण गाव | पुढारी

चक्क एका गुहेत राहते संपूर्ण गाव

झोंगडोंग-गुझोऊ : पृथ्वीवर पाताळलोक नेमके कुठे आहे, याची आजवर कोणालाही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, पृथ्वीतलावर एक गुहा अशीही आहे, जिथे सोयीसुविधांचा मागमूसही नाही आणि तरीही तेथे 100 हून अधिक जणांचे वास्तव्य आहे. पाताळलोक म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या या गुहेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आश्चर्य म्हणजे, या दुर्गम गावातील लोकांना बाजारात जाण्यासाठी 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते. मुलांच्या अभ्यासासाठी शाळा आणि बास्केटबॉल मैदान मात्र या गावात आहे. पाताळलोकासारखे असलेल्या या गावाचे नाव झोंगडोंग असे आहे. चीनमधील गुइझोऊ प्रांतातील डोंगराळ भागात एका गुहेत हे गाव वसलेले आहे. या गावातले लोक शतकानुशतके या गुहेत राहत आहेत. ही गुहा समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर आहे.

2008 मध्ये चीन सरकारने गुहांमध्ये राहणे हा चिनी संस्कृतीचा भाग नसल्याचे सांगून या गावातील शाळा बंद केली. त्यामुळे आता या गावातील मुले गावापासून दूर असलेल्या दुसर्‍या शाळेत जातात आणि गावात दररोज सकाळ-संध्याकाळ दोन तास अभ्यास करतात. या गावात येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे. शिवाय, या गावातील नागरिकांना बाहेरच्या जगाशी सहज संपर्क साधता यावा, यासाठी रस्ताही बांधण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांनी हे गाव सोडले आहे; पण अजूनही तिथे अनेक लोक राहतात. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी शिकणारी मुले दर आठवड्याला गावी येऊन कुटुंबीयांना भेटतात.

संबंधित बातम्या
Back to top button