मेंदूचा आकार वाढतोय; पण ‘आयक्यू’ होतोय कमी!

मेंदूचा आकार वाढतोय; पण ‘आयक्यू’ होतोय कमी!
Published on
Updated on

लंडन : जनरेशन झेड म्हणजे 1997-2012 दरम्यान जन्मलेले लोक आणि जनरेशन अल्फा म्हणजे त्यानंतर जन्मलेले लोक. अशा लोकांचा मेंदू 100 वर्षांपूर्वी जन्मलेल्या लोकांपेक्षा आकाराने मोठा आहे. 'डेली मेल' या ब्रिटिश वेबसाईटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, एकीकडे त्यांच्या मेंदूच्या आकारात वाढ झाली आहे, तर दुसरीकडे या दोन पिढ्यांचा 'आयक्यू' म्हणजेच बुद्ध्यांक मागील पिढ्यांच्या तुलनेत कमी झाला आहे. हा अभ्यास काय सांगतो ते जाणून घेऊया…

अभ्यासानुसार, विद्यापीठाच्या 'यूसी डेव्हिस हेल्थ रिसर्च'ने 1930-1970 मध्ये जन्मलेल्या लोकांच्या मेंदूच्या विविध आकारांवर एक अभ्यास केला. ज्यामध्ये हे समोर आले की, सायलेंट जनरेशन म्हणजे 1928-1946 दरम्यान जन्मलेले लोक. जनरेशन एक्स म्हणजे1965-1980 दरम्यान जन्मलेल्या लोकांच्या तुलनेत मेंदू 6.6 टक्क्यांनी वाढला आहे. हे अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्याशी संबंधित पैलूंमुळे असू शकते, असे अभ्यासात म्हटले आहे. याशिवाय या लोकांमध्ये वयाशी संबंधित स्मृतिभ्रंशाचा धोकाही कमी होऊ शकतो.

या अभ्यासात असे म्हटले आहे की, तरुण पिढीच्या आयक्यू स्कोअरमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ज्याचे कारण मोबाईल आणि इंटरनेटवरील वाढते अवलंबित्व आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, एखाद्या व्यक्तीच्या मेंदूच्या आकाराचा त्याच्या बुद्धिमत्तेवर फारसा परिणाम होत नाही. दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. एका मीडिया रिपोर्टस्नुसार, न्यूरोसायंटिस्टना असेही आढळून आले आहे की, मेंदूतील अतिरिक्त वजनाचा आपल्या बुद्धिमत्तेवर थोडासा प्रभाव पडतो. आपल्या मेंदूमध्ये अधिक स्मृती साठवण्यात मदत होऊ शकते. अभ्यासात असे दिसून आले आहे की, 1970 च्या दशकात जन्मलेल्या लोकांच्या मेंदूचा आकार 1930 मध्ये जन्मलेल्या लोकांच्या तुलनेत 6.6 टक्क्यांनी वाढला आहे.

75 वर्षांपासून केलेल्या या अभ्यासानुसार, आजच्या पिढीच्या मेंदूचा आकार सुमारे 1,400 मि.लि. आहे. त्याचवेळी, 1930 मध्ये जन्मलेल्या लोकांच्या मेंदूचा आकार 1,234 मि.लि. आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील घडामोडींतूनच त्याची खरी कारणे शोधता येतील, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 75 वर्षे केलेल्या या अभ्यासात असे आढळून आले की, 1970 मध्ये जन्मलेल्या लोकांच्या मेंदूचा आकार 1930 मध्ये जन्मलेल्या लोकांच्या तुलनेत 6.6 टक्क्यांनी वाढला आहे. संशोधनानुसार, आजच्या पिढीच्या मेंदूचा आकार अंदाजे 1,400 मि.लि., तर 1930 मध्ये जन्मलेल्या लोकांच्या मेंदूचा आकार 1,234 मि.लि. होता. एवढ्या वर्षांत असे का घडले, हे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील घडामोडींवरूनच कळू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news