मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबामुळे वाढतो स्ट्रोकचा धोका

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबामुळे वाढतो स्ट्रोकचा धोका

बीजिंग : चिनी संशोधकांनी म्हटले आहे, की उच्च रक्तदाब असलेल्या मधुमेहाच्या रुग्णांना स्ट्रोकचा धोका संभवू शकतो. जर्नल डायबिटीज अँड मेटाबोलिक सिंड्रोम क्लिनिकल रिसर्च अँड रिव्ह्यूजमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सिस्टोलिक ब्लड प्रेशरचा 'टाईप-2' मधुमेहाच्या रुग्णांमधील स्ट्रोकच्या धोक्याशी थेट संबंध आहे.

चीनमध्ये सेंट्रल साऊथ युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या टीमने म्हटले आहे की 'टाईप-2' मधुमेह असलेल्या लोकांना उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोकचा धोका संभवतो. रक्तदाबाचे आकलन केल्याने स्ट्रोकच्या धोक्याबाबत जाणून घेण्यास मदत मिळू शकते. या संशोधनासाठी 8,282 लोकांवर 6.36 वर्षे पाहणी केली. त्यावेळी उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकमधील हा संबंध दिसून आला.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब या जगभरातील प्रमुख आरोग्य समस्या आहेत. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अन्य लोकांच्या तुलनेत इस्केमिक स्ट्रोकचा धोका दोन ते चार पट अधिक वाढतो. स्ट्रोक आलेल्या मधुमेहाच्या रुग्णांना दीर्घकाळ रुग्णालयात राहावे लागू शकते, त्यांच्यामध्ये विकलांगता येऊ शकते आणि त्यांच्या मृत्यूचा दरही अधिक असू शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news