समुद्रात बुडालेल्या जहाजावर चार देशांचा दावा

समुद्रात बुडालेल्या जहाजावर चार देशांचा दावा

कोलंबिया : कॅरेबियन महासागरात 300 वर्षांपूर्वी बुडालेल्या एका स्पॅनिश जहाजावर सापडलेल्या खजिन्यावर एक-दोन नव्हे, तर चार देशांनी आपला हक्क सांगितला आहे. 1708 मध्ये ब्रिटिश लष्कराच्या आक्रमणात हे जहाज बुडाले होते. या जहाजावर 20 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीचा खजिना असल्याचे दावे यापूर्वी वेळोवेळी केले गेले आहेत.

कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी सॅन जोन्स जहाजाचे अवशेष बाहेर काढण्याचे आदेश दिल्यानंतर या सर्व घडामोडींना वेग आला. अमेरिकन कंपनी वूडस होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशनच्या पथकाने 1981 साली या जहाजाचा शोध लावला होता; पण 2015 साली कोलंबियाने आपल्या नौदलाने या जहाजाचा शोध लागल्याचा दावा केला.

हे जहाज स्पेनचे आहे, त्यामुळे त्यांनी यावर आपला हक्क सांगितला आहे. याशिवाय, बोलिविया देशाने आपल्या गुलामांनी जहाजावरील खजिन्याचा शोध लावल्याचा दावा केला. त्यावरून हा वाद पेटला आहे. हे जहाज समुद्र सपाटीपासून 3 हजार मीटर खोलवर असून, रोबोच्या माध्यमातून विखुरले गेलेल्या खजिन्याची काही छायाचित्रे यापूर्वी काढली गेली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news