जगातील सर्वात एकांत घर | पुढारी

जगातील सर्वात एकांत घर

एलिडेई : आधुनिक जगापासून दूर राहणे अनेकांना आवडते; पण ते इतके सोपेही असत नाही. सध्याच्या युगात तर हे खूपच कठीण होत चालले आहे. आईसलँडमध्ये मात्र एक अशीही जागा आहे, जिथे मागील 100 वर्षांपासून कोणाचेच वास्तव्य राहिलेले नाही. या रहस्यमय घराबद्दल अर्थातच बर्‍याच वदंता आहेत. 110 एकर जागेवरील एलिडेई बेटावर ही एकमेव इमारत आहे.

काहींच्या मते, या रहस्यमय घरात एका साधूचे वास्तव्य होते. आणखी एका कथेनुसार, आईसलँड सरकारने गायक-गीतकार ब्योर्कला हे बेट भेटीदाखल दिले होते. वेस्ट मॅनेजर बेट समूहाचा एक हिस्सा असणारे एलिडेई मागील शतकभरापासून निर्मनुष्य झाले आहे. या बेटावर पाच कुटुंबांचे वास्तव्य होते आणि ते मासे पकडून व मधमाशा पाळून उदरनिर्वाह करत असत, असेही सांगितले जाते.

द ट्रॅव्हेलने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या बेटावर केवळ जहाजाच्या माध्यमातूनच पोहोचता येण्यासारखे आहे. येथे वीज, पाणी, इनडोअर पाईपलाईनपैकी काहीही सुविधा उपलब्ध नाही.

Back to top button