चंद्राला मिळेल स्वतंत्र ‘टाईम झोन’!

चंद्राला मिळेल स्वतंत्र ‘टाईम झोन’!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आपण एकाच पृथ्वी नामक ग्रहावर राहत असलो, तरी प्रत्येक देशाची वेळ स्थानपरत्वे वेगवेगळी असते. ज्यावेळी आपल्याकडे दिवस असतो, त्यावेळी अमेरिकेत रात्र असते व हे भौगोलिक स्थिती आणि पृथ्वीचे सूर्याभोवतीचे तसेच स्वतःभोवतीचे भ्रमण यामुळे घडते. यामुळे वेळेत फरक पडणे साहजिकच असते. मात्र, यामध्येही समन्वय घातला जात असतो. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र. आता चंद्रावर अनेक मोहिमा आखल्या जात असल्याने त्याच्यासाठीही एक 'टाईम झोन' बनवला जाणार आहे. जगाला चंद्रावरच्या 'युनिव्हर्सल' वेळेची गरज आहे. जेणेकरून जगातून पार पडणार्‍या मोहिमांसाठी वेळ निर्धारित करता येईल. अमेरिकेने 'नासा' या संस्थेला या वेळेचे मापक तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.

मीडिया रिपोर्टस्मध्ये व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीच्या माध्यमातून म्हटले आहे की, प्रस्तावित कोऑर्डिनेटेड लूनर टाईम (एलटीसी) चा उद्देश अंतराळ मोहिमांना मदत करणे आणि कार्यक्षमता वाढवणे आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी व्हाईट हाऊसने 'नासा'ला 2026 ची मुदत दिली आहे. व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसीच्या संचालक आरती प्रभाकर म्हणतात की, वैज्ञानिक शोध, आर्थिक विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक स्वतंत्र टाईम झोन आवश्यक आहे. पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी आहे. यामुळे, तेथील वेळ सुमारे 58.7 मायक्रोसेकंदांनी वाढते. व्हाईट हाऊसने असेही म्हटले आहे की, भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये सुरक्षित नेव्हिगेशन सुनिश्चित करण्यासाठी, चंद्राच्या कक्षेतील वेळ निर्धारित करणे आवश्यक आहे.

त्यामुळे 'नासा'वर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी काळात अनेक देशांचे चंद्रावर यान पाठवण्याचे नियोजन आहे. अशा परिस्थितीत, समन्वयित चंद्र वेळ (एलटीसी) अस्तित्वात असल्यास अंतराळ मोहिमांना मदत होईल. चंद्रावरील प्रत्येक प्रदेशात घड्याळाचा वेग वेगळा असतो. याचा सरळ अर्थ असा आहे की, चंद्र आणि त्याच्या कक्षेत घड्याळ एकाच वेगाने धावणार नाही. बर्नहार्ड ह्यूफेनबॅच, जे ईएसएच्या मानव आणि रोबोटिक अन्वेषण संचालनालयात काम करतात, ते म्हणाले की, युनिव्हर्सल मान्यता असणारे टाईम झोन अंतराळवीरांसाठीदेखील लागू होणार आहे. पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावर 29.5 दिवस जास्त असतात. त्यात केवळ शीत तापमान असलेल्या चंद्राच्या पंधरवड्याच्या रात्रीचाही समावेश आहे. ते म्हणाले की, चंद्रासाठी टाईम झोन निश्चित केल्यानंतर, आपण इतर ग्रहांसाठीदेखील हे करू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news