अंतराळात जाण्यापूर्वी ‘या’ चिम्पान्झीने घेतले होते 18 महिन्यांचे ट्रेनिंग

अंतराळात जाण्यापूर्वी ‘या’ चिम्पान्झीने घेतले होते 18 महिन्यांचे ट्रेनिंग

Published on

वॉशिंग्टन : अंतराळात केवळ माणूसच नव्हे, तर कुत्री-माकडंही जाऊन आलेली आहेत, याची अनेकांना कल्पना नाही. 'हॅम' नावाच्या एका चिम्पान्झीला 'नासा'ने अंतराळात पाठवले होते. विशेष म्हणजे, या चिम्पान्झीला अंतराळात पाठवण्यापूर्वी त्याला अठरा महिन्यांचे विशेष ट्रेनिंगही देण्यात आले होते.

अंतराळात शरीरावर पडणार्‍या प्रभावाचा अभ्यास करण्याची 'नासा'ची इच्छा होती. त्यामुळे या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने 'हॅम'ला अंतराळात पाठवले होते. 1958 मध्ये फ्लोरिडाच्या जंगलात 'हॅम'ला पकडण्यात आले होते. स्पेस मिशनसाठी सन 1959 मध्ये 'नासा'ने हॅम चिम्पान्झीला अमेरिकन सैन्याच्या बेसवर पाठवले, जिथे त्याला अंतराळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अठरा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर साडेतीन वर्षांनी 31 जानेवारी 1961 मध्ये 'हॅम'ला एका कंटेनरमध्ये बांधून प्रोजेक्ट मर्क्युरी (एमआर-2) साठी रवाना करण्यात आले. मिशन लाँच केल्यानंतर 16.30 मिनिटांनी 'हॅम' अंतराळात पोहोचला.

या काळातील त्याच्या शरीरातील बदलांच्या नोंदी घेण्यात आल्या. मात्र, परतीच्या प्रवासात त्याचे कॅप्सूल आपल्या लक्ष्यापासून 209 किलोमीटर दूर अटलांटिक महासागरात पडले. तेथून त्याला परत आणणे आव्हानात्मक होते. त्याला आणण्यासाठी एक जहाज पाठवण्यात आले. दोन तासांनंतर हे जहाज त्याच्याजवळ पोहोचले त्यावेळी ते जिवंत होते आणि शांतही बसले होते. त्याला ज्यावेळी कंटेनरमधून बाहेर काढले, त्यावेळी त्याच्या चेहर्‍यावर चक्क हास्यही दिसले. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर 'हॅम'ला वॉशिंग्टनमधील एका प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news