सेऊल : कृत्रिमरीत्या प्रचंड तापमान निर्माण करण्यासाठी अनेक देशांचे संशोधक कार्यरत असतात. अलीकडेच चीनने असा 'कृत्रिम सूर्य' बनवला होता. आता दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी 10 कोटी अंश सेल्सिअस तापमान निर्माण करून नवा विक्रम केला आहे. इतके तापमान आतापर्यंत कोणत्याच देशाने निर्माण केले नाही. परमाणू संलयन प्रयोगातून निर्माण केलेले हे तापमान सूर्याच्या कोअरपेक्षा सातपट अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यातील औद्योगिक ऊर्जेच्या दिशेने हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
सध्या जगभरातील अनेक देश कृत्रिम सूर्यावर काम करत आहेत. यामध्ये चीन, अमेरिका आणि फ्रान्स यांचा समावेश आहे. परमाणू संलयनला इंग्रजीमध्ये न्यूक्लियर फ्यूजन असे म्हटले जाते. 2 परमाणू एकमेकांशी जोडले जातात तेव्हा हे निर्माण होते. यातून खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. जेव्हा परमाणू अत्याधिक गरमी आणि दबावामध्ये असतो तेव्हा संलयन होते. पृथ्वीवर ही प्रक्रिया प्रत्यक्षात साकारण्यासाठी विशेष चेंबरची गरज असते.
वैज्ञानिकांना न्यूक्लियर फ्यजून रिएक्टर चालविण्यात यश मिळाल्यानंतर अनेक फायदे होणार आहेत. जीवाश्म इंधन जळल्यानंतर होणार्या संलयन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही; पण पृथ्वीवर या प्रक्रियेमध्ये यश मिळवणे हे खूपच आव्हानात्मक आहे. संलयन ऊर्जा मिळवण्याच्या सर्वसाधारण प्रक्रियेमध्ये टोकामक नावाचा डोनटच्या आकाराचा रिअॅक्टर सहभागी असतो. ज्यामध्ये प्लाझ्मा बनवण्यासाठी हायड्रोजन व्हेरियंटला असाधारण उच्च तापमानावर गरम केले जाते. उच्च तापमान आणि उच्च घनत्वाचे प्लाझ्मा परमाणू संलयन रिअॅक्टरांटरच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये लांब आणि अधिक काळासाठी प्रक्रिया होऊ शकते, अशी माहिती कोरियाई इन्स्टिट्यूट ऑफ फ्यूजन एनर्जीमध्ये 'केएसटीएआर' रिसर्च सेंटरचे संचालक सी-वू यून यांनी दिली. उच्च तापमान प्लाझ्माची अस्थिर प्रकृतीमुळे हे उच्च तापमान कायम ठेवणे सोपे नाही. त्यामुळेच हा रेकॉर्ड खूप महत्त्वपूर्ण असल्याचे ते सांगतात.