कुत्र्याला समजते मालकाचे बोलणे!

कुत्र्याला समजते मालकाचे बोलणे!
Published on
Updated on

बुडापेस्ट : पाळीव प्राण्यांचे वर्तन, त्यांची बुद्धिमत्ता आणि मालकाशी असलेले त्यांचे नाते, याबाबत सातत्याने नवनवे संशोधन होत असते. कुत्रा हा जगभरातील एक लाडका पाळीव प्राणी. 'सीट' म्हटलं की बसणारा, 'रन' म्हटलं की पळणारा कुत्रा अनेक घरांमध्ये पाहायला मिळू शकतो. मात्र, हे केवळ शिकवलेले शब्दच त्याला कळतात, असे नव्हे. त्याला संदर्भानुसार मालकाचे बरेच बोलणे समजत असते. नुकताच कुत्र्यांच्या मेंदूवर संशोधकांनी अभ्यास केला. यात झालेल्या 18 कुत्र्यांच्या परीक्षणात असे दिसून आले की, माणसाप्रमाणेच कुत्र्याचा मेंदूदेखील चांगले काम करतो. ते एखादी गोष्ट चटकन लक्षात ठेवू शकतात. त्यांना कळते की, आपल्यासमोर कसला विषय सुरू आहे. बुडापेस्ट येथील इओटवोस लॉरँड विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन 'करंट बायोलॉजी' या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

अभ्यासकर्त्या आणि सहलेखिका मारियाना बोरोस यांच्या मते, मानवेतर प्राण्यांना संदर्भावर आधारित शब्द समजू शकतात की नाही, याबद्दल दीर्घकाळ वाद सुरू आहे. याबाबतीत अनेक मत-मतांतरे मांडण्यात येत आहेत. बोरोस पुढे म्हणतात की, कुत्र्यांसमोर वस्तूंचा उल्लेख केलास त्यांच्यात शब्दानुसार वस्तू ओळखण्याची क्षमता असते. बोरोस पुढे म्हणतात की, कुत्र्यांना शब्दांचा अर्थ कळतो की नाही, हे जाणून घेण्याचा आमचा उद्देश होता. वस्तूचे नाव आणि समोरील प्रत्यक्ष वस्तू यात फरक असल्यास कुत्र्यांच्या मेंदूला तसे सिग्नल मिळतात.

बुडापेस्ट येथील इओटवोस लॉरँड विद्यापीठात करण्यात आलेल्या या संशोधनात कुत्र्यांना परिचित वस्तू व शब्दांचा वापर आला, नंतर समोर ठेवण्यात आलेल्या वस्तूंचे नाव कुत्र्यासमोर घेण्यात आले, तर काही वेळा समोरील वस्तू व शब्दांमध्ये फरक होता. तर काही प्रकरणांमध्ये अशा वस्तू कुत्र्यांसमोर ठेवल्या गेल्या ज्यांचे नाव काही तरी आणि वस्तू काही तरी वेगळी होती. त्याचा परिणाम असा झाला की, जेव्हा शब्दाशी जुळणारी एखादी वस्तू समोर असते तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये वेगळा पॅटर्न दिसायचा आणि शब्दाशी जुळणारी वस्तू समोर नसताना मेंदूमध्ये वेगळा पॅटर्न दिसायचा. माणसांमध्येही हेच दिसून येते.

कुत्र्यांसमोर उल्लेख करण्यात आलेल्या शब्दाशी संबंधित वस्तूची प्रतिमा मनात निर्माण करण्याची क्षमता कुत्र्यांमध्ये असते. तसेच, भाषेचे आकलन करून त्या पद्धतीने ते वावरतात. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, कुत्रे जे दाखवतात त्यापेक्षा जास्त समाजदार असतात. याचा अर्थ असा की, कुत्र्यांच्यादेखील एक गोष्ट दुसर्‍या गोष्टीशी जोडण्याची मेंदूची प्रक्रिया असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news