Niagara Falls : सूर्यग्रहणावेळी नायगारा धबधब्याजवळ येणार दहा लाख पर्यटक

Niagara Falls
Niagara Falls

वॉशिंग्टन : अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवरील जगप्रसिद्ध धबधबा म्हणजे नायगारा. Niagara Falls खरे तर त्याच्यापेक्षा उंच तसेच मोठे धबधबे जगात अन्यही आहेत, पण घोड्याच्या नालेच्या आकारातील या धबधब्याची बातच और आहे! जगभरातील पर्यटक हा सुंदर, खळाळता धबधबा पाहण्यासाठी येत असतात. 8 एप्रिलला अमेरिकेत खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ते पाहण्यासाठी या धबधब्याजवळ सुमारे दहा लाख पर्यटक येतील, असा अंदाज आहे.

नायगारा धबधब्याजवळच्या  Niagara Falls  भागात सन 1979 नंतर प्रथमच असे सूर्यग्रहण दिसणार आहे. नॅशनल जिओग्राफिक चॅनेलने हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी नायगारा धबधब्याचे ठिकाण सर्वात उत्तम असल्याचे घोषित केल्यापासून याबाबत पर्यटकांमध्ये अधिकच उत्सुकता आहे. नायगारा धबधब्याच्या परिसराचे मेयर जिम डियोडाटी यांनी म्हटले आहे की या एकाच दिवशी शहरात आतापर्यंतचे सर्वाधिक पर्यटक येऊ शकतात. इतक्या पर्यटकांची व्यवस्था करण्यासाठीची तयारीही सुरू आहे.

वाहतुकीची कोंडी, आपत्कालीन सुविधा, मोबाईल फोनचे Niagara Falls नेटवर्कची समस्या अशा गोष्टींचाही विचार करण्यात आलेला आहे. उत्तर अमेरिका, मेक्सिको, कॅनडामधून खग्रास सूर्यग्रहणाचे द़ृश्य पाहता येणार आहे. यावेळी 'डायमंड रिंग'सारखे द़ृश्यही दिसून येईल. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान सरळरेषेत ज्यावेळी चंद्र येतो त्यावेळी सूर्य काही वेळ झाकोळून जातो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या खगोलीय घटनेलाच सूर्यग्रहण असे म्हटले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news