दुकान फोडण्यापूर्वी योगा करणारी चोर!

दुकान फोडण्यापूर्वी योगा करणारी चोर!
Published on
Updated on

सिडनी : काही चोरही अफलातूनच असतात. चोरी करण्यासाठी एखाद्या घरात घुसल्यावर तिथे फ्रीज उघडून काहीबाही खात बसणे, एसी सुरू करून बेडरूममध्ये डाराडूर झोपणे, चिठ्ठी लिहून घरमालकाची माफी मागणे असे अनेक प्रकार करणारे चोर देश-विदेशात पाहायला मिळालेले आहेत. मात्र एखादा चोर चोरी करीत असतानाही 'हेल्थ कॉन्शस' असतो हे म्हणजे अतीच झाले! एका चोराने दुकान फोडण्यापूर्वी काही योगासने केली व त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे! हा चोर पुरुष नव्हता तर एक महिला होती.

हा व्हिडीओ पाहून पोलिसांचं डोकं सुद्धा पार चक्रावून गेलंय. कारण हा चोर चोरी करण्यापूर्वी चक्क योगा करत होता. "पैशांपेक्षा आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे" अशा गमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या जात आहेत. ही अजब चोरी ऑस्ट्रेलियामध्ये झाली आहे. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार फिलिप्पा नावाच्या बेकरीमध्ये ही चोरी झाली.

चोरी करणारी एक महिला होती. तिनं पैशांसोबतच बेकरीमधील खाण्याचे पदार्थ देखील चोरी केले. ती पार्किंग एरियामधून बेकरीमध्ये शिरली होती, पण आश्चर्याची बाब म्हणजे चोरी करताना इतर चोर शक्य तितकी घाई करतात. कारण आपण पकडले जाऊ ही भीती त्यांना सतावत असते, पण ही चोर महिला चक्क योगा करत होती. होय, चोरी करण्याआधी तिनं शांतपणे व्यायाम केला आणि मग आपलं काम करून ती पसार झाली. मात्र तिचा हा योगा पार्किंग एरियामधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. अन् आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news