चंद्रावर माणूस पाठवण्यासाठीचा खर्च… | पुढारी

चंद्रावर माणूस पाठवण्यासाठीचा खर्च...

वॉशिंग्टन : चंद्रावर एखाद्या व्यक्तीला पाठवण्याचं असेल, तर त्याचा खर्च इतका जास्त आहे की, 1972 नंतर आजपर्यंत चंद्रावर एखाद्या अंतराळवीराला पाठवण्याचा प्रयत्न कोणत्याही देशाने केलेला नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलेले शेवटचे अंतराळवीर हे यूजीन सर्नन होते. आता एखाद्या व्यक्तीला चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, ते पाहूया.

जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे होते, तेव्हा अमेरिकेने पुन्हा एकदा चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची योजना आखली होती. यासाठी येणार्‍या खर्चाचा अंदाज लावला गेला, तेव्हा तो 1.6 अब्ज डॉलर्स होता. भारतीय रुपयात बोलायचं झालं तर तो खर्च सुमारे 133 अब्ज रुपये इतका होता. एवढा खर्च पाहून अमेरिकेलाही घाम फुटला आणि त्यांनी हे अभियान तुर्तास थांबवलं! हा झाला एखाद्या व्यक्तीला चंद्रावर पाठवण्याचा खर्च.

आता चंद्रावर जर पाण्याची बाटली पाठवायची असेल, तर किती खर्च येईल? वास्तविक असा प्रयोग आजवर झालेला नाही. पण, सुरक्षितपणे पाणी पाठवण्यासाठी स्पेस क्राफ्टमध्ये ज्या प्रकारची सुरक्षा आणि तंत्रज्ञान वापरण्यात येईल ते चंद्रावर माणसाला पाठवण्यासारखंच असेल, त्यापेक्षा ते थोडं कमी असेल. एखाद्या व्यक्तीला चंद्रावर पाठवण्यासाठी जितका खर्च येतो त्यापेक्षा वस्तू पाठवण्याचा खर्च कमी येईल.

Back to top button