पोटातून बाहेर काढला जिवंत मासा! | पुढारी

पोटातून बाहेर काढला जिवंत मासा!

लंडन : व्हिएतनाममध्ये एका व्यक्तीच्या पोटात दुखत होते म्हणून तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी या व्यक्तीची तपासणी केल्यावर त्यांना धक्का बसला. डॉक्टरांनी ऑपरेशन करून या व्यक्तीच्या पोटातून चक्क जिवंत मासा बाहेर काढला आहे. हा अत्यंत दुर्मीळ प्रकार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

मेट्रो यूकेने याबाबतचे वृत्त दिले आहे. क्वांग निन्ह प्रांतातील रुग्णालयात ही आश्चर्यकारक शस्त्रक्रिया पार पडली. व्हिएतनामच्या क्वांग निन्ह प्रांतात राहणार्‍या एका 34 वर्षीय व्यक्तीच्या पोटात दुखत होते. वेदना असह्य झाल्याने तो रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी तत्काळ या व्यक्तीच्या अल्ट्रासाऊंड आणि एक्स-रे तसेच अनेक वैद्यकीय तपासण्या केल्या. या व्यक्तीचे मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही हडबडले.

मेडिकल रिपोर्टमध्ये या व्यक्तीच्या पोटात मासा दिसून आला. डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी या व्यक्तीच्या पोटातून जिवंत मासा बाहेर काढला आहे. या मासा 30 सेंमी लांबीचा आहे. पोटात दुखण्यासह या व्यक्तीला पोटात काही तरी हालचाली जाणवत होत्या. मात्र, त्याला नेमके काय होतंय हे लक्षात आले आहे. मासा पोटात असल्यामुळे या व्यक्तीच्या पोटाला सूज आली तसेच त्याला असह्य वेदना सुरू झाल्या. पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या या व्यक्तीच्या पोटातून डॉक्टरांनी जिवंत मासा बाहेर काढला आहे. मात्र, मासा या व्यक्तीच्या पोटात कसा गेला, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला!

Back to top button