एका दिवसात संपत्तीमध्ये 2.7 लाख कोटींची वाढ! | पुढारी

एका दिवसात संपत्तीमध्ये 2.7 लाख कोटींची वाढ!

वॉशिंग्टन : एका अब्जाधीशांच्या संपत्तीत एकाच दिवसात तब्बल 2.7 लाख कोटी रुपयांची म्हणजेच 32.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. एवढी मोठी वाढ झाल्यामुळं हा अब्जाधीश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. बर्नार्ड अरनॉल्ट असं या अब्जाधीशाचं नाव आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्तीत वाढ कधी दिसून येत नाही. अचानक वाढ झाल्यामुळं बर्नार्ड अरनॉल्ट यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे.

बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांनी सगळ्यांचे विक्रम मोढीत काढले आहेत. जेफ बेझोस आणि अ‍ॅलन मस्क या दिग्गज अब्जाधीशांना बर्नार्ड अरनॉल्ट यांनी मागं टाकलं आहे. हे दोघेही अब्जाधीश खूप मागे पडले आहेत. दरम्यान, बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत 22 मार्च रोजी 2.7 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती मुकेश अंबानी यांच्यापेक्षा दुप्पट अधिक आहे. बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती एवढी वाढली आहे की, जगातील 450 अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीपेक्षाही जास्त आहे. जेफ बेझोस आणि अ‍ॅलन मस्क यांना बर्नार्ड अरनॉल्ट यांनी खूप मागे टाकलं आहे.

आता परत पहिल्या स्थानावर येण्यासाठी जेफ बेझोस आणि अ‍ॅलन मस्क यांना मोठी मेहनत करावी लागणार आहे. बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत एका दिवसात 2.7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झालीय, या वाढीसह त्यांची एकूण संपत्ती 230 अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळं ते संपत्तीच्या बाबतीत सगळ्यांच्या पुढे गेले आहेत. 2024 चा विचार केला, तर बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत 22.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. कोणत्याही अब्जाधीशाने 230 अब्ज डॉलरचा आकडा गाठण,े ही पहिलीच वेळ आहे. यादीत दुसर्‍या क्रमांकावर जेफ बेझोस आहेत. त्यांच एकूण संपत्ती 202 अब्ज डॉलर आहे. त्याच्या संपत्तीत 750 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. या वर्षात जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 24.8 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

Back to top button