70 देशांमध्ये पाळली जाते ‘डे लाईट सेव्हिंग टाईम’ची परंपरा

70 देशांमध्ये पाळली जाते ‘डे लाईट सेव्हिंग टाईम’ची परंपरा
Published on
Updated on

न्यूयॉर्क : अमेरिका, कॅनडा, क्युबासह अनेक देशांमध्ये 10 मार्चपासून डे लाईट सेव्हिंग टाईमची परंपरा सुरू होत असताना या देशांच्या घड्याळातील वेळ एक तासाने पुढे केली गेली आहे. दिवसाउजेडी असलेल्या प्रकाशाचा पुरेपूर उपयोग करून घेणे हा याचा मुख्य उद्देश असतो. यामुळे दैनंदिन कामकाजासाठी दिवसाचा अतिरिक्त वेळ मिळू शकतो आणि याचबरोबर विजेचीही बचत होते. डे लाईट सेव्हिंग टाईम आणि याची प्रक्रिया यामुळे नेहमी औत्सुक्याची ठरत आली आहे.

कोणत्याही देशातील प्रमाणवेळ एक तासाने मागे किंवा पुढे करण्याची प्रक्रिया ही डे लाईट सेव्हिंग टाईम या नावाने ओळखली जाते. काही ठिकाणी प्रत्येक सहा महिन्यातून एकदा ही प्रक्रिया केली जाते. उन्हाळ्यात घड्याळाचे काटे एक तासाने पुढे केले जातात. यामुळे दिवसातील उजेडाचा अधिक उपयोग करून घेता यावा, असा उद्देश असतो. त्यानंतर हिवाळ्यात पुन्हा एकदा घड्याळ एक तासाने मागे आणले जाते.

ध्रुवांवर दिवस व रात्रीतील अंतर काही वेळा अधिक असते. यामुळे डीएसटीची (डे लाईट सेव्हिंग टाईम) गरज भूमध्य व कर्क तसेच मकर रेखावृत्ताच्या आसपास असलेल्या देशांना भासत नाही. ध्रुवाच्या नजीकच्या क्षेत्रात ठरावीक कालखंडात दिवस छोटे व रात्र मोठी तर काही कालखंडात दिवस मोठे व रात्र छोटी असते. त्या अनुषंगाने काही देश डीएसटीचा अवलंब करत आले आहेत.

डे लाईट सेव्हिंग टाईमची ही प्रक्रिया 1908 मध्ये सर्वप्रथम कॅनडाने अवलंबली होती. त्यानंतर 1918 मध्ये अमेरिकेने देखील त्याचे अनुकरण केले. आतापर्यंत जगभरातील 70 देशांमध्ये डीएसटीचा अवलंब केला जातो. अमेरिकेत मात्र सर्वच ठिकाणी याला मान्यता मिळालेली नाही. या प्रक्रियेमुळे आपल्या बॉडी क्लॉकवर परिणाम होतो, असे ऑक्सफर्ड विवीतील प्रो. रसल फोस्टर यांचा दावा आहे. डे लाईट सेव्हिंग टाईममुळे झोपेचा एक तास कमी होतो आणि यामुळे निद्रानाश, हृदयविकार, रक्तदाब, ताणतणाव, अल्झायमरसारखे विकार सुरू होतात, असे ते स्पष्टीकरणार्थ म्हणतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news