दोन वधूंसह विवाहासाठी त्याने गाठले मलेशिया! | पुढारी

दोन वधूंसह विवाहासाठी त्याने गाठले मलेशिया!

क्वालालंपूर : चीनमध्ये दोन विवाहांना मान्यता नाही. पण, तेथील एका महाभागाला एकाच मंडपात दोन वधूंशी विवाह करून घ्यायचा होता आणि चीनमध्ये याची रीतसर परवानगी नसल्याने त्याने थेट मलेशिया गाठत एकाच मंडपात दोन्ही वधूंशी विवाह केले. या अनोख्या सोहळ्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली असून त्यावर अनेक टीकाटिपणी देखील होत आहे.

प्रारंभी या महाभागाने चीनमध्ये रीतसर परवानगीसाठी जरूर प्रयत्न केले. पण, त्यातून काहीही साध्य होत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्याने थेट मलेशियाची तिघांची तिकिटे बुक केली आणि थेट मलेशिया गाठत तेथे विवाह सोहळा आयोजित केला. या सोहळ्यात त्याने दोन्ही वधूंशी विवाह केला आणि याची छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट करताच खर्‍या अर्थाने नाट्य सुरू झाले. फेसबुकने नंतर ही पोस्ट हटवली. पण, या सोहळ्याची काही छायाचित्रे त्यानंतरही इंटरनेटवर उपलब्ध राहिली. या छायाचित्रात ही व्यक्ती दोन वधूंशी विवाह करत असताना आणि त्यानंतर शॅम्पेनसह आनंद लुटत, तसेच केक कापत असताना दिसून आले.

Back to top button