चीनमध्ये रोबोकडून हॉटेल रूमवर फूड डीलिव्हरी

चीनमध्ये रोबोकडून हॉटेल रूमवर फूड डीलिव्हरी
Published on
Updated on

शांघाय : चीनला नवनवे क्रांतिकारी तंंत्रज्ञान आणि कल्पक, रचनात्मक शोधासाठी विशेष ओळखले जाते. आता येथील एका हॉटेलमध्ये रोबोने फूड डीलिव्हरीची रूम सर्व्हिस देत आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल पुढे टाकले आहे. केन अ‍ॅबरोड या ट्रॅव्हल ब्लॉगरने शांघायमधील हा अनुभव सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. केनने यावेळी रोबोकडून ही फूड डीलिव्हरी कशी झाली, त्याचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
या व्हिडीओत तो प्रारंभीच म्हणतो, दारावरची बेल वाजली, याचा अर्थ रोबो दरवाजापर्यंत येऊन ठेपलेला असणार आहे. आता रोबोटिक आवाजात तो चायनीज भाषेतून संवाद साधतो आहे. तो नेमके काय म्हणतो आहे, हे समजत नाही. मात्र, त्याने आपली फूड डीलिव्हरी आणलेली आहे, इतकाच याचा अर्थ आहे.
केनने दरवाजा उघडला, त्यावेळी रोबो समोरच त्याच्या प्रतीक्षेत होता. केनने त्यानंतर रोबोवरील ओपन हे बटण दाबले आणि एक टॉप पॉप उघडले, त्यात केनची फूड डीलिव्हरी उपलब्ध होती. केनने ती डीलिव्हरी घेतल्यानंतर तो छोटा टॉप पॉप पुन्हा बंद झाला आणि रोबो तेथून परतत असल्याचे व्हिडीओच्या शेवटच्या टप्प्यात दिसून आले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट होताच युझर्सनी अनेक अफलातून प्रतिक्रिया दिल्या. एकाने विचारले, डीलिव्हरी जरी रोबोने केली असली, तरी फूडही रोबोनेच तयार केले का? आणखी एकाने 2050 मधील जग कसे असेल, याची ही एक झलकच!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news