बिस्किटांपासून बनवली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती | पुढारी

बिस्किटांपासून बनवली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

प्रयागराज : संपूर्ण देशभरात शुक्रवारी अगदी उत्साहात महाशिवरात्री साजरी केली गेली. या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीनिमित्त प्रयागराज येथे बाबा केदारनाथच्या भव्य मंदिराची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही प्रतिकृती 2151 बिस्किटांपासून बनवण्यात आली आहे. बिस्किटांपासून बनवलेले हे केदारनाथ मंदिर आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

अजय गुप्ता आणि त्यांच्या अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या ललित कला विभागाच्या पथकाने 4 दिवसांच्या मेहनतीनंतर हे मंदिर तयार केले आहे. उत्तराखंडचे केदारनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंग आणि 4 धामांपैकी एक आहे. हे भगवान भोलेनाथांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.

बिस्किटांपासून बनवलेले केदारनाथ मंदिर पाहण्यासाठी संगमच्या काठावर मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. सोबतच अनेकांनी या प्रतिकृतीचे आणि कलाकारांचे कौतुक केले आहे. महाशिवरात्रीच्या संदर्भात भगवान शिवाशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत. सोबतच या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा शुभविवाह झाला होता, अशीही मान्यता आहे. यासोबतच महाशिवरात्रीला काही गोष्टींचे दान करणेही शुभ मानले जाते. महाशिवरात्रीला दान केल्यास महादेव भक्तांना इच्छित फळ देतात, अशी धारणा असते.

Back to top button